करून काढले 35 एमएमचे चार खडे
चार खड्याचे अंदाजे वजन पाव किलोे
रूग्ण सुखरूप घरी रवाना
बीड । वार्ताहर
सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक रूग्णालयातील डॉक्टर रूग्णांकडे सर्वप्रथम संशयाने पाहतात. ताप, खोकला, सर्दी नसेल तर पुढचा उपचार देतात. नसता त्या रूग्णाला जिल्हा रूग्णालयात रेफर केले जाते. अनेक ठिकाणी तर स्वत:चे खासगी रूग्णालय बंद असल्याचे निदर्शनास येतात. परंतू काही जिगरबाज डॉक्टर कोरोनाच्या आजाराला न घाबरता इतर रूग्णांना बिनधास्त आणि योग्य सेवा देतांना दिसत आहेत. असे ताजे उदाहरण पहायला मिळाले ते येथील काकू-नाना हॉस्पिटलमध्ये एका छोट्याशा शस्त्रक्रिया दरम्यान अद्भुत, आश्चर्य आणि कुतहुल वाटणार असे काही झाले आहे. एका रूग्णाच्या लघवीच्या पिश्वीतून चार 35 एमएमचे खडे (स्टोन) निघाले. त्या खड्याचे वैशिष्ट्ये म्हणजे सर्व खडे समोसा आकाराचे असून त्यांचे वजन सारखेच आहे. लाखात एखादा रूग्ण असा आढळून येतो अशी प्रतिक्रिया शस्त्रक्रिया करणारे डॉ.रोहन गायकवाड यांनी बोलतांना व्यक्त केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, शिरूर तालुक्यातील राक्षसभुवन येथील प्रभाकर नामदेव कोल्हे (वय 72) यांना लघवीचा त्रास होत असल्याने दि.27 मे रोजी शहरातील काकू-नाना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले. तेथिल तज्ज्ञ सर्जन डॉ.रोहन गायकवाड यांनी कोल्हे यांच्या तपासण्या करून सोनोग्राफी केली असता लघवीच्या पिशवीत चार खडे असल्याचे दिसून आले. त्या दृष्टीकोनातून त्यांच्यावर दि.28 मे रोजी शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया अवघड असली तरी एका तासात ती शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली आणि कोल्हे यांच्या लघवी पिशवीतून 35 एमएमचे चार खडे ज्याचे वजन अंदाजे पावकिलो आहे. विशेष म्हणजे हे चारही खडे समोसा आकाराचे असून जणु काही या खड्यांना शरीरात आकार देवून बनविण्यात आले असल्याचे दिसून येतात. हमखास मुतखड्याचा आजार असल्यावर लघवीच्या पिशवीत मोठमोठे खडे निघतात. परंतू सारखा आकार, सारखे वजन आणि विशेष म्हणजे तीनही बाजूने तीन कोणी घडलेले दिसतात. डॉ.रोहन गायकवाड यांच्या म्हणण्यानुसार लाखात एखाद्या रूग्णात असे प्रकार आढळून येतात. परंतू हा नेमका काय प्रकार आहे? सध्या तरी समजू शकले नाही. तसेच सध्या रूग्ण बरा होवून घरी गेला असून रूग्णांचे नातेवाईकांनी काकू-नाना हॉस्पिटलचे संचालक डॉ.बालाजी जाधव आणि संपादक अजित वरपे व शस्त्रक्रिया करणे डॉ.रोहन गायकवाडसह त्यांच्या टीमचे आभार मानून अभिनंदन केले.
संशोधनाचा विषय
डॉ.रोहन गायकवाड हे सर्जन तज्ज्ञ असून त्यांनी मोठमोठ्या शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. कोल्हे यांच्या सोनोग्राफीत खडे मोठे असल्याचे दिसत होते. शस्त्रक्रिया दरम्यान यावेळी हे खडे बाहेर आले, डॉ.गायकवाड यांच्यासह काकू-नानामधील इतर डॉक्टरांनी आश्चर्य व्यक्त केले. डॉ.गायकवाड यांनी या खड्याविषयी काही तज्ज्ञांचा सल्लाही घेतला. परंतू सर्वांनीच फक्त आश्चर्य व्यक्त केले. नेमके शरीरात एका आकाराचे ते पण त्रिकोणी आणि सारख्या वजनाचे खडे आढळून येणे हा नॉर्मल विषय नाही. याचे संशोधन होणे अत्यंत गरजेचे आहे.
आरोग्य प्रशासनासमोर मोठे आव्हान
एखादी आश्चर्यकारक घटना घडली की, त्याविषयी संशोधन होणे गरजेचे आहे. प्रत्येक विकास हा संशोधनानंतरच समोर आलेला आहे. त्यामुळे हे विषय छोटेसे जरी असले तरी सध्या आरोग्य प्रशासनासमोर मोठे आव्हान असल्यासारखे दिसून येते. दै.रिपोर्टरच्या प्रतिनिधीला ही माहिती देण्यापुर्वी डॉ.रोहन गायकवाड यांनी अनेक तज्ज्ञांना हे खडे दाखवून नेमके हे प्रकरण काय आहे? शरीरात असा कोणता घटक आहे की, तो शरीरातील मुत्राशयात असलेल्या दगडाला असा आकार देवू शकतो. आरोग्य प्रशासनाने या सर्व बाबींचा विचार करावा. जेणेकरून हे प्रकरण काय आहे हे समजून येईल.
Leave a comment