बीड । वार्ताहर
येथील पंचायत समितीमधील यापूर्वीच सेवा समाप्त करण्यात आलेल्या तीन कर्मचार्यांविरुध्द शनिवारी (दि.30) शिवाजीनगर ठाण्यात शासनाची तब्बल 14 कोटी 80 लाखांची फसवणूक आणि अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान या अपहार प्रकरणी चौकशी करण्याची मागणी आ.विनायक मेटे यांनी केली होती.
ऑपरेटर बंडु राठोड, तांत्रिक सहाय्यक प्रशांत आबुज व सहाय्यक कार्यक्रम अधिकारी शाम पंडित यांचा आरोपीत समावेश आहे. याबाबत प्रभारी गटविकास अधिकारी रविंद्र तुरुकमारे यांनी शिवाजीनगर ठाण्यात तक्रार नोंदवली. गुन्हे दाखल झालेल्या तीनही कर्मचार्यांची यापूर्वीच सीईओंनी सेवा समाप्त केलेली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत मंजुर कामाच्या मूळ संचिका, प्रशासकीय, तांत्रिक मान्यता, कार्यारंभ आदेश अन् कामाची अंदाजपत्रके नसतानाही या कर्मचार्यांनी त्याची तपासणी न करताच नरेगा संकेतस्थळावर कामाचे बोगत संकेताक क्रमांक तयार केले. तसेच दिलेल्या जि.प.गटाच्या कार्यक्षेत्राबाहेर जावून कामाचे प्रत्यक्ष ठिकाण निश्चित करुन अप्रुव्हड करुन 14 मार्च ते 18 मार्च 2020 या कालावधीत बोगस हजेरीपत्रक निर्गमित केले. जे की, संकेतस्थळावर शून्य करण्यात आले आहेत.अन् त्याचे पेमेंट झालेले नाही. शिवाय कोणतेही अभिलेखे उपलब्ध नसताना 14.80कोटींची कुशल देयके ऑनलाईन केले.या कर्मचार्यांची ही सचोटी संशयास्पद असल्याचे गटविकास अधिकारी तुरुकमारे यांनी फिर्यादीत नमुद केले आहे. त्यानुसार तीघांविरुध्द शासनाची फसवणूक करुन अपहार करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
Leave a comment