गेवराईत माँ संतोषी अर्बन शाखेचा उपक्रम
गेवराई । वार्ताहर
शहरातील माँ संतोषी अर्बन मल्टिपल निधी या शाखेच्या वतीने आपल्या युट्युब चॅनलच्या माध्यमातून तज्ञ,डॉक्टर, अधिकारी,पदाधिकारी,राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेकांच्या मुलाखती घेऊन कोरोना जनजागृती मोहीम हाती घेऊन एक आगळा वेगळा उपक्रम राबवण्यात येत असून या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
शहरातील माँ संतोषी अर्बन मल्टीपल निधी या शाखेने एक उपक्रम सुरू केला आहे. यामध्ये त्यांनी नागरिकांनी कोरोनाबाबत कशी काळजी घेतली पाहिजे यासाठी आरोग्य विभागतील अधिकारी तसेच संचार बंदीबाबत प्रशासनाचे आदेश पाळण्यासाठी पोलीस प्रशासन,तहसील कार्यालय, नगर परिषद यांच्या प्रमुख अधिकारी, तर नागरिकांनी सूचनाचे पालन करावे याबाबत सामाजिक कार्यकर्ते व राजकीय नेत्यांच्याही मुलाखती घेऊन एक जनजागृती मोहीम हाती घेतली आहे तर याला प्रत्येक क्षेत्रातील तज्ञ, अधिकारी,राजकीय यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून त्यांच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी यशस्वी करण्यासाठी संस्थेचे चेअरमन संजय भालशंकर व्यवस्थापक प्रीती खडके,प्रवीण कुलथे,धीरज वरकड,विनोद पानसरे,ज्ञानेश्वर घोलप,मंगेश गायकवाड, विकास नाटकर हे परिश्रम घेत आहेत.
Leave a comment