केज । वार्ताहर
तालुक्यातील पिंपळगाव येथे कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून क्वॉरंटाईन केलेल्या इसमाने नियम न पाळता गावात सार्वजनिक ठिकाणी उठबस करणे तसेच त्याच्या नातेवाईकांच्या घरी ये-जा करणे आणि त्याच्या प्रकृतीची विचारपूस करणार्या ग्रामपंचायत कर्मचार्यास धमकावून शिविगाळ केल्याच्या कारणावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित व्यक्तीला शेतात क्वॉरंटाईन केले असताना त्याने सार्वजनिक ठिकाणी फिरणे व सार्वजनिक ठिकाणी गावात उठबस करणे आणि त्याच्या नातेवाईकांच्या घरी जाणे असा प्रकार केला. म्हणून त्यास ग्रामपंचायत कर्मचारी व ग्राम दक्षता समिती सदस्य यांनी समज दिली. मात्र ग्रामपंचायत सदस्यास शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. ग्रामसेवक हरीश केदार यांच्यासह सरपंच आणि इतर लोकांनी त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. तरी देखील त्याने ऐकले नाही. नंतर ग्रामसेवक हरीश केदार यांच्या फिर्यादीवरून केज ठाण्यात क्वॉरंटाईन व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. जमादार बाळकृष्ण मुंडे हे पुढील तपास करीत आहेत.
Leave a comment