धारूर । वार्ताहर
धारूर शहरात खरीप हंगाम तोंडावर आलेला असताना खत व बियाणे खरेदी साठी शेतकर्यांची लगबग असताना कोरोना रुग्न आढळल्याने बेमूदत काळा साठी संचारबंदी लावण्यातआली आहे. यामुळे शहरा सह तालूक्यातील शेतकर्यांची धिवपळ होत असून खते व बियाणे शेतकर्यांन घेण्या साठी या दुकानाना परवानगी द्यावी आशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बालासाहेब जाधव यांनी केली आहे.
शेतकर्यान साठी महत्वाचा असणारा खरीप हंगाम मोजक्या दिवसा वर आला आहे पेरणी पुर्व कामे करून शेतकरी पेरणी साठी सज्ज आसतान धारूर शहरात कोरोन रुग्न सापडल्याने अनिश्चीत कालावधी साठी संचारबंदी लावल्याने सर्व बाजारपेठा बंद आहे खत बि बियानाची दुकानाने बंद आहेत. यामुळे शहरातील व तालूक्यातील शेतकरी बेजार झाले असून पुढील कमी कालावधीत खत बी बियाने पाहीजे ते मिळतील का हि चिंता आहे. त्यामुळे प्रशासनाने सर्व बाबीचा विचार करून शेतकर्यांची होणारी गैरसोय दुर करण्या साठी खत बि बीयानेची दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी आशी मागणी जिल्हाधिकारी यांचेकडे बाजार समितीचे संचालक बालासाहेब जाधव यांनी केली आहे.
Leave a comment