धारूर । वार्ताहर
शहरात कोरोना प्रादूर्भाव रोकण्या साठी नियूक्त केलेल्या सुरक्षा समित्या प्रभावी पणे काम करत असून होम क्वांराटाईन केलेल्या व्यक्तीच्या प्रभाग एक व दोन मधील समितीनी घरोघर जाऊन भेटी घेतल्या. जनजागृती करण्यात आली नगराध्यक्ष डॉ.स्वरूपसिंह हजारी हे उपस्थित होते.
प्रभाग एक मधील दोन्ही समितीनी एकञीत पणे प्रभागात फेरी मारून नागरीकात जनजागृती केली. प्रशासनास सर्व नियमाचे पालन करून सहकार्य करण्याचे व आपली सुरक्षितता आपणच पाळण्याचे अवाहण केले. होम क्वांराटाईन मध्ये असणार्या व्यक्तीच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणूण घेऊन त्यांना सुचन दिल्या. या प्रभागात बाहेर गावून आलेल्या पण नोंदणी नसणारे तीन कुटूंबांना भेटी घेऊन त्यांना होम क्वॉरंटाईनचे नियम पाळण्याचे सुचना दिल्या. यावेळी प्रभाग दोन मध्ये भेटी देण्यात आल्या. या भेटीच्या वेळी नगराध्यक्ष डॉ.स्वरूपपसिंह हजारी बाळासाहेब गायकवाड नगरसेवक बालाजी चव्हाण शेख गफार जैनोद्दीन, संतोषबप्पा सिरसट बाळासाहेब सोनटक्के पञकार अनिल महाजन अतूल शिनगारे राम शेळके सतिश पोतदार समितीचे दत्ताञय धोञे शेख पाशा भाई विलास शिंदे डॉ.नवनाथ चव्हान, सय्यद ईस्माईल, राजाभाऊ बोबडे नगर परिषद कार्यालय अधिक्षक नितीन इजाते, कर्मचारी श्रीकांत वडगावकर माणिक लोखंडे, माणिक गायसमुद्रे, सचिन डावकर, संदीप नलावडे, विष्णू कराड, अरुण वाघमारे, किरण नेहरकर, इंजिनीयर मुंडे, बजरंग शिनगारे, सुभाष पवार, चंद्रकांत फुके आदी उपस्थीत होते.
Leave a comment