आष्टी । वार्ताहर
आष्टी तालुक्यातील चिखली-खानापूर फाट्यावर बांधण्यात आलेल्या महानुभव पंथाच्या आश्रमाला दि.29 मे रोजी सायंकाळच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आगा लगली. आश्रमाचे परिसरातील स्वयंपाकघर आणि घरातील सर्व गृहोपयोगी वस्तू ,सामान जळून खाक झाले आहे.
आश्रमाचे मागील बाजूला विद्युत मंडळाच्या लाईन आहे. वार्याच्या हेलकावे बसल्याने आश्रमाच्या छतावर ठिणग्या पडल्या आणि वार्याच्या दिशेने पेट घेतला.आष्टी नगरपंचायत यांना फोन केल्यानंतर अग्निशमन वाहन आले तोपर्यंत सर्व आश्रम जळून खाक झाले होते.या आगीत आश्रमातील सेवेकर्यांचे तीन लाखाचे नुकसान झाल्याचे आश्रमचालक उद्धवराज धाराशिवकर यांनी सांगितले. आश्रमामध्ये सारिका धाराशिवकर,प्रीती धाराशिवकर, जनाबाई धाराशिवकर,ऋतुजा धाराशिवकर, दिगंबर धाराशिवकर व संचालक उद्धवराज बाबा धाराशिवकर हे सेवेकरी राहतात. येथे महिला व पुरुष आहेत. या महानुभव आश्रमामध्ये कृष्णपूजा व दत्तपूजा केली जाते. अनेक सेवेकरी लॉकडाऊनमुळे बाहेर गुंतलेले आहेत.या आगीत जीवनावश्यक वस्तू धान्य भांडेकुंडे फ्रिज इलेक्ट्रिकल वस्तू ,गॅस स्वयंपाकाचे सर्व साहित्य, किराणामाल, साहित्य जळून खाक झाल्याने सर्व आश्रमातील सेवेकरी आता उघड्यावर आले आहेत. आगीत अतोनात नुकसान झाल्याने आश्रमातील सेवेकार्यांच्या डोळ्यातील अश्रू अनावर झाले होते.नव्याने आश्रम उभारण्यासाठी या सर्व महानुभाव सेवेकर्यांनी मदतीची हाक दिली आहे.दानशुरांनी मदत करावी असे आवाहन करण्यात आले आहे.दानशुरांनी उद्धवराज दत्ता धाराशिवकर यांच्या बँक खात्यात आर्थिक मदत टाकावी असे आवाहन करण्यात येत आहे.
Leave a comment