माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या वतीने काकु-नाना प्रतिष्ठाणचा संकल्प
बीड-
कोरोनासारख्या वैश्विक महामारीपासून बचाव करण्यासाठी व रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आयुष मंत्रालयाने सुचवलेल्या अर्सेनिक अल्बम या औषधाचे वाटप बीड मतदारसंघातील घरोघरी असणाऱ्या पाच लाख नागरिकांना वाटप केले जाणार आहे. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या वतीने काकु-नाना प्रतिषठाणने हा संकल्प केला असून कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी हा मोठा दिलासा मिळणार आहे.
काकु-नाना प्रतिष्ठाण व श्री सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज यांच्या माध्यमातून हे औषध तयार करण्यात आले आहे. याचे वाटप स्वतंत्र यंत्रणेमार्फत लवकरच घरोघरी जाऊन करण्यात येणार आहे. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी आज याबाबत संपूर्ण यंत्रणेची माहिती घेवून बीड मतदारसंघात पाच लाख नागरिकांना हे औषध पुरवण्यात यावे असे सांगितले आहे. केंद्र व राज्य सरकारने होमिओपॅथी औषध कोरोना साथीच्या रोगाला रोखण्यासाठी उपयुक्त असल्याचे सांगितले आहे. सध्या अॅलोपॅथीमध्ये या रोगावर निश्चित औषधी उपलब्ध नसल्यामुळे केंद्र सरकारकडे इतर चिकित्सा पद्धतीचा वापर करण्याचे प्रयत्न सुरू होते म्हणून आयुष मंत्रालयाने एक टास्क फोर्स तयार केला होता. केंद्रीय होमिओपॅथी आयुष मंत्रालय यांच्या अॅडव्हायझरीनुसार अर्सेनिक अल्बम या होमिओपॅथी औषधाने रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयोग करण्यात यावा असे सूचवल्यामुळे याचा वापर देशभर होऊ लागला व त्याचे परिणाम देखील सकारात्मक दिसून आले. बीड जिल्ह्यातही आता कोरोनाचा शिरकाव झाला आहे. या पार्श्वभूमी आदर्श शिक्षण संस्थेचे सचिव तथा माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी बीड विधानसभा मतदारसंघातील सर्व कुटुंबांना मोफत औषधाचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. जुनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही औषधी वाटप होणार आहे. अर्सेनिक औषधाच्या चार गोळ्या सकाळी सलग तीन दिवस घ्यायच्या आहेत. तसेच एक महिन्याने पुन्हा तीन दिवस याच गोळ्या घ्यायच्या आहेत. गोळ्या चालू असताना कॉफी, तंबाखू, कच्चा लसून, कांदा सेवन करू नये, औषधी घेतल्याच्या आधी व नंतर अर्धा तास काहीही सेवन करू नये. सरकारला व जनतेला आता खऱ्या अर्थाने होमिओपॅथीचे महत्व पटलेले आहे. स्व.केशरकाकु क्षीरसागर यांनी मराठवाड्यात पहिले होमिओपॅथीक कॉलेज सुरू वेâले आहे. जनतेने या औषधींचा लाभ घ्यावा असे आवाहन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी केले आहे.
Leave a comment