बीड । वार्ताहर
बीड जिल्ह्यातील कापुस उत्पादक शेतकर्यांना त्यांच्याकडील एफएक्यु दर्जाचा शिल्लक कापुस शासनास हमी भावाने विक्री करायचा असल्यास त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील बाजार समितीकडे 1 जून ते 3 जून 2020 या तीन दिवसाचे कालावधीत आपली प्रायमिक नोंदणी करावी असे आवाहन जिल्हा प्रशासन तसेच जिल्हा उपनिबंधक शिवाजी बडे यांनी केले आहे.
बीड जिल्ह्यातील कापुस उत्पापदक शेतकन्यांना शासकीय हमी भावाने कापुस विक्रीसाठी नोंदणी करता यावी म्हणून ही मुदतवाढ दिली गेली आहे.बीड जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य सहकारी कापुरा उत्पादक पणन महासंघ मर्या.व कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.यांच्या वतीने शासकिय हमी भावाने कापुस खरेदी करण्यात येत आहे. कापुस उत्पादक शेतकर्यांना कापुस सुरळीतपणे व विना अडचण खरेदी व्हावा,शेतकर्यांना खरेदी केंद्रावर जास्त काळ थांबण्याची येळ येवू नये यासाठी कापूस विक्री करण्यास इच्छुक शेतकर्यांची प्राथमिक नोंदणी कृषि उत्पन्न बाजार समितीकडे करुन नोंदणी अनुक्रमांकानुसार शेतकर्यांना मेसेज पाठवुन खरेदी केंद्रावर बोलावून टोकन वाटप करावे याबाबतचा निर्णय जिल्हा प्रशासनातर्फे घेण्यात आला आहे. जिल्ह्यात यापूर्वी कृषि उत्पन्न बाजार समिती मार्फत कापसउत्पादक शेतकर्यांचा कापुस शासकीय हमी भावाने खरेदी करण्यासाठी प्राथमिक नोंदणी करण्यात आलेली आहे. त्यानुसार प्राथमिक नोंदणी केलेल्या शेतकर्यांच्याच कापसाची खरेदी सध्या चातु आहे. मात्र जिल्ह्यातील काही शेतकरी प्राथमिक नोंदणीपासुन वंचित राहिलेले आहेत. त्यांन खरेदी केंद्रावर कापुस विक्री करण्यास अडचणी येत आहेत अशा शेतकर्यांकडून नोंदणी प्रक्रिया सुरु करण्याची मागणी होत आहे.हे लक्षात घेवून प्रशासनाने नोंदणीसाठी आता 1 ते 3 जून अशी मुदतवाढ दिली आहे.
कापूस नोंदणी करण्यापूर्वी शेतकर्यांनी या गोष्टी जाणून घ्याव्यात
*कापुस नोंदणी करतांना शेतकर्यांनी स्वतःच्या आधार कार्डाची झेरॉक्स प्रत, कापुस पिकाचा पेरा नोंद असलेला सातबाराची प्रत, बँक खाते नंबरसाठी पासवुकाच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत,स्वतःचा मोबाईल ब्रमांक इत्यादी कागदपत्रे कृषि उत्पन्न वाजार समितीकडे देऊन,आपले कापसाची नोंदणी करावी.
*जमिन थारणा क्षेत्र,कापुस पीक पेरा इत्यादीची मर्यादीत नोंदणी आवश्यक असून शेतकर्यांनी शक्यतो नांव नोंदवताना स्वतःचा मोबाईल क्रमांक नमुद करावा.एकाच मोबाईल क्रमांकावर अनेक शेतकर्यांनी नोंदणी करु नये.नोंदणी कार्यक्षेत्रातील वाजार समितीकडेच करावी. एकापेक्षा जास्त वेळेस व अनेक ब्वाजार समितीमध्ये नोंदणी करु नये.
*शासकीय हमी भावाने कापुस खरेदीसाठी ही शेवटची नोंदणी असून 3 जूननंतर नोंदणी केली जाणार नाही व टोकन दिले जाणार नाही.
*बाजार समितीकडे नोंदणीसाठी संबंधित शेतकर्याने स्वतः आवश्यक त्या कागदपत्रासह उपस्थित राहन प्राथमिक नोंदणी करुन घ्यावी व नोंदणी केले बाबतची पावती व नोंदणी क्रमांक कृषि उत्पन्न बाजार समितीकडुन हस्तगत करावा.
*सदर क्रमांकानुसार बाजार समिती मार्फत संबंधित शेतकरी यांनी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर मेसेज/फोनव्दारे कापुस विक्रीचा दिनांक, वार,वेळ व केंद्राचे नांव कळवण्यात येईल.
*त्यानुसार दिलेल्या केंद्रावर कापुस विक्रीस आणण्यात यावा. शेतकर्यांनी कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नोंदणीसाठी येतांना व कापूस विक्रीस येताना सामाजिक अंतर राखणे,मास्क वापर करणे व सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक आहे.
Leave a comment