अंबाजोगाई  । वार्ताहर

येथील स्वामी रामानंद तीर्थ रूग्णालयातील ५६ डाॅक्टरांना मुंबई येथे प्रतिनियुक्तीवर पाठविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, हा निर्णय अन्यायकारक असून ग्रामीण भागातील रूग्णसेवा विस्कळीत करणारा आहे.त्यामुळे पर्यायी डाॅक्टरांची व्यवस्था झाल्याशिवाय स्वारातीमधील डाॅक्टरांना मुंबईला हलविण्यात येऊ नये अशी मागणी करत आ. नमिता मुंदडा यांचे सासरे तथा ज्येष्ठे नेते नंदकिशोर मुंदडा यांनी अधिष्ठाता कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे.

स्वाराती रूग्णायलयात ५१८ खाटांना परवानगी आहे.परंतु येथील दररोजची ओपीडी २ हजारांपेक्षाही अधिक आहे.नियमितपणे सातशेपेक्षा अधिक रूग्ण ॲडमिट असतात.रूग्णालयासाठी अपेक्षित असलेल्यापैकी सध्या ३५ टक्के डाॅक्टरांची कमतरता आहे.त्यातच सध्या शासनाने स्वारातीमध्ये कोरोना रूग्णांसाठी वाढीव तिनशे खाटांची सोय केली आहे. सध्या आहे तेच डाॅक्टर या वाढीव खाटांसाठी वापरले जाणार आहेच.वास्तविक पाहता स्वाराती रूग्णालयाला अतिरिक्त डाॅक्टर आणि कर्मचारी देण्याची गरज होती,परंतु उफराटा निर्णय घेत शासनाने येथील ५६ डाॅक्टरांना मुंबईला प्रतिनियुक्तीवर पाठविण्याचे आदेश दिले आहेत.हे सर्व डाॅक्टर दररोज ओपीडी आणि शस्त्रक्रीया विभागात काम करणारे असल्याने याचा विपरित परिणाम स्वारातीमधील दैनंदिन तसेच संभाव्य कोरोना रूग्ण सेवेवर होणार आहे. त्यामुळे या डाॅक्टरांना इथून हलवयाचे असेल तर आधी स्वारातीसाठी पर्यायी डाॅक्टर उपलब्ध करून द्या अशी भुमिका नंदकिशोर मुंदडा यांनी घेतली आहे.
शुक्रवारी रात्रीच्या बैठकीचे फलित न निघाल्याने आणि डाॅक्टरांना कुठल्याही क्षणी मुंबईला रवाना करण्यात येऊ शकते याची कुणकुण लागल्याने मुंदडा शनिवार सकाळपासून कार्यकर्त्यांसह अधिष्ठाता कार्यालयाबाहेर ठिय्या देवून बसले आहेत.त्यांच्या समवेत नगरसेवक शेख रहिम,सारंग पुजारी,संतोष शिनगारे,दिनेश भराडिया,ॲड.संतोष लोमटे,हिंदुलाल काकडे, प्रशांत आदनाक,शरद इंगळे,शिवाजी पाटील, सुदाम पाटील,नूर पटेल, ताहेर भाई,योगेश कडबाने यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.