खरिपाची कामे रखडली;बोरगावसह परिसरातील शेतकरी हतबल

नेकनूर वार्ताहर

प्रशासनाच्या धोरणामुळे जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या केज तालुक्यात काही गावांना दोन महिन्यापासून बोरगाव चेकपोस्टने वेठीस धरले तर पंधरा दिवसापासून कळंब येथील रुग्णमुळे बफर झोनची शिक्षा देत कोंडून ठेवले खते बी-बियाणे यांच्या गाड्या चेक पोस्ट वरुन परत पाठवल्या 14 दिवसांनंतर बफर झोन उठणार असल्याचे सांगितले गेले मात्र प्रशासनाचे आदेश निघत नसल्याने चेकपोस्टवर पोलिसांची मनमानी कायम आहे. दोन महिन्यापासून बोरगाव या गावाला पलीकडे दुसर्‍या जिल्ह्याची सीमा तर अलीकडे चेकपोस्टचा अतिरेक त्रासदायक ठरला आहे.

 

कळंब तालुक्यातील पाथर्डीतील रुग्णामुळे केज तालुक्यातील सीमेवरील बोरगावसह काही गावे बफर झोनमध्ये समाविष्ट करण्यात आले. यामुळे बोरगाव चेकपोस्टवर वाहतुकीस प्रतिबंध करण्यात आला. यामुळे काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या पेरणी साठी आवश्यक खते, बी-बियाणे यांची उपलब्धता करणार्‍या कृषी विक्रांत्याच्या माल घेऊन येणार्‍या गाड्या परत जात असल्याने भविष्यात सीमेवर असलेल्या गावाची यामुळे मोठी अडचण होत आहे.  पाथर्डी येथील रुग्ण निगेटिव आल्याने कळंब बाजार पेठ पूर्वरत सुरू झाली आहे. शिवाय बोरगाव येथून कळंबकडे जाणारा मधला मार्ग खोदून बंद केला आहे . या गावाला केज  तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी दोन महिन्यापासून चेकपोस्ट मुळे  महत्त्वाच्या कामाला जाण्यापासून रोखले गेले आता तर बफर झोन चे कारण असल्याने वैद्यकीय,बँक, शिवाय शासकीय कामही करण्यासाठी जाता येत नाही. याच बरोबर जिवणावशक वस्तूंची ने आण करणारी वाहने अडकू लागल्याने ग्रामस्थांना पेरणीच्या तोंडावर विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. तरी  या भागाच्या अडचणीची माहिती तहसीलदार मेंडके यांनी जिल्हाधिकारी याच्यापर्यंत पोहचवून या गावाला आतातरी मोकळा श्वास घेऊ द्या.पेरणीच्या तोंडावर रोखून पडलेली कामे मार्गी नाहीत लागली तर पुढील वर्ष पाण्यात जाईल. इतर गावांनाही लागलीच सूट मिळत असताना दुसर्‍या जिल्ह्यातील रुग्णामुळे या गावाला आणखी किती दिवस प्रशासनाच्या आदेशाची प्रतीक्षा करावी लागणार आहे असा सवाल शेतकर्‍यांतून विचारला जात आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.