तलवाडा । वार्ताहर
ग्रामीण भागात होणार्या वार्षिक सण,उत्सव सोहळे यंदा कोरोना लॉकडाऊनमुळे बंद झाले. यावर अवलंबून असणार्या अनेक घटकांचे जीवनचक्र बदलून गेले असून यात्रा उत्सवातून होणारा प्रपंच गुजारा थांबल्याने अनेकांवर आर्थिक चणचणीला सामोरे जावे लागत आहे.
ग्रामीण भागात दरवर्षी पिर,दर्गा देवी,देवतांच्या यात्रा, ऊरुस तसेच संदलच्या माध्यमातून होणार्या आर्थिक उत्पन्नातून व त्या ठिकाणी होणार्या खरेदी-विक्रीतून अनेकांना वर्षाभराचा रोजगार व उत्पन्न मिळते. याच मिळकतीतून अनेकांचा वर्षभराचा प्रंपच गुजारा होत होता परंतु देशावर कोसळलेल्या चिनी संकटामुळे कोरोना सारख्या महाभंयकर महामारीने होत्याचे नव्हते केले. संबंध देशराभरात सण,वार,उत्सव, वार्षिक यात्रा या सार्यांना फाटा देत नागरिकांनी राष्ट्रीय एकत्मता जपली आहे. कोरोनाला हरवण्यासाठी सर्व जण प्रयत्नशील असताना कोरोनाचा कोहराम अनेकांचे जीव घेत आहे. दुसरीकडे ग्रामीण भागात ऊरुस व यात्राच्या माध्यमातून आर्थिक उत्पन्न खुंटल्याने येणार्या काही कालावधीत आर्थिक स्त्रोतच नसल्याने उपासमारीचे संकट उभे टाकणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Leave a comment