कोरोना बाधित महिला मुंबई रिर्टन;केजच्या एकाचा रिपोर्ट अनिर्णयीत
बीड । वार्ताहर
जिल्ह्यातून शुक्रवारी सकाळी तपासणीसाठी लातूरच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेले 118 पैकी तब्बल 116 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत तर एका 40 वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ती बीड शहरातील बालेपीर भागातील असून मुंबईतून ती बीडला परतली होती. याशिवय केज येथील एका रुग्णाचा अहवाल अनिर्णयीत आहे. जिल्हा प्रशासनाकडून ही माहिती देण्यात आली.
मागील दहा दिवसापासून जिल्ह्यात कोरोना बाधीतांचा आकडा वाढत गेला. मात्र शुक्रवारचे बहुतांश रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. कारेगाव (ता.पाटोदा) येथील एका कोरोनाबाधीत रूग्णाच्या संपर्कात बीड शहरासह बारा गावातील लोक आले होते. त्यामुळे जिल्हा आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. बाधीतांच्या संपर्कात आलेल्या लोकांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी जिल्ह्यातून 118 थ्रोट स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. रात्री त्याचा रिपोर्ट प्राप्त झाला. यातील 116 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर एक अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अन्य एक अहवाल अनिर्णयीत आहे.
Leave a comment