आरोग्य यंत्रणा तळ ठोकून
डोंगरकिन्ही,धारुर । वार्ताहर
बीड जिल्ह्यातून गुरुवारी तपासणीसाठी पाठवलेल्या स्वॅबमध्ये धारूर येथील एक जण कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले.या रुग्णाचा शहरात प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष संपर्क आल्याने आता संपुर्ण धारूर शहर अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जारी केला आहे. तसेच पूर्णवेळ संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
कारेगांव (ता.पाटोदा) येथे 26 मे रोजी कोरोनाचा 1 रुग्ण आढळून आला होता. त्याच्या संपर्कातील तीन व्यक्ती 28 मे रोजी बाधीत आढळून आल्या आहेत. त्यापैकी एक रुग्ण डोंगरकिन्ही (ता.पाटोदा) येथे नागरिकांच्या संपर्कात आल्यामुळे डोंगरकिन्ही गावही प्रशासनाने कंटेटमेंट झोन म्हणून घोषित केले आहेकोरोना रोखण्यासाठी डोंगरकिन्ही पुढील अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ बंद केले आहे.
याच पार्श्वभूमीवर अंमळनेर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक शामकुमार डोंगरे, यांच्यासह सर्व पोलीस ,होमगार्ड कर्मचारी ,त्याच बरोबर डोंगरकीन्ही प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ मयुर शिंदे, डॉ. भोंडवे मॅडम यांच्यासह सर्व कर्मचारी या रात्रंदिवस परिसरात तळ ठोकून आहेत. सहाय्यक निरीक्षक श्यामकुमार डोंगरे यांनी पाटोदा रोड ,नगरवरून बीडकडे जाणार रोड , नाळवंडी कारेगाव रोड ,बीड नगरकडे जाणारा रोड या चहूबाजूंनी चेकपोस्ट लावून गाव सील केले आहे. येणार्या-जाणार्यांची कसून चौकशी केली जात आहे.फक्त अत्यावश्यक सेवेची वाहने सोडली जात आहेत.
Leave a comment