बीड । वार्ताहर
धारूरमध्ये आढळेल्या कोरोनाबाधित रूग्णाला डायलेसीची आवश्यकता असल्याची मागणी नातेवाईकांनी केल्यानंतर जिल्हा रूग्णालयातील कर्मचार्यांनी त्यावर डायलेसचे उपचार सुरू केले आहेत. कोरोनाग्रस्त रूग्णावर कुठलेही उपचार करणे अंत्यत अवघड प्रक्रिया असते. मात्र जिल्हा रूग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिकांनी हे डायलेसीस सुरू केल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी दिली.
धारूरमधील कोरोनाग्रस्त रूग्ण हा किडनीच्या आजाराने त्रस्त होता. त्याला डायलेसीस करणे अंत्यत आवश्यक होते. कोरोना असल्याने डायलेसीस करणे जरा जिकरीचे होते. 2 वर्षापासून किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या या रूग्णाला औरंगाबाद येथील घाटी रूग्णालयात नेहमी डायलेसीस घ्यावे लागत होते. मात्र कोरोना पॉझिटिव्ह झाल्यामुळे तो बीड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. कोविड आजारात त्याला डायलेसीस करणे जिकरीचे असतांनाही जिल्हा रूग्णालयामध्ये डॉक्टर मनोज मुंडे, डायलसेस तंत्रज्ञ किशोर दुनघव, परिचारिका स्वाती गव्हाणे यांनी या रूग्णावर डायलेसचा उपचार केला. जिल्हा रूग्णालयात कोरोना रूग्णावर प्रथमच डायलेसीस केली गेली.
Leave a comment