एक लाख चार हजार चारशे रुपयाची सापडलेलेल्या रकमेची बॅग वापस
नांदुर घाट/ श्रीकांत जाधव
केज तालुक्यातील नांदूर घाट येथील भारतीय सैन्य दलामध्ये कार्यरत असणारे ईश्वर बोबडे हे गावी सुट्टीवर आले आहेत, गावाकडे सुट्टीवर असताना देखील प्रखर देशभक्ती ईमानदारी व माणुसकी दाखवून देणारी घटना घडली आहे ,सुभाष जाधव हे नांदुर घाट पासून पाच किमी अंतरावर असलेल्या गदळेवाडी येथील सुभाष जाधव यांनी डीसीसी बँकेमधून आपल्या खात्यातील एक लाख चार हजार चारशे रुपये उचलले होते ,आणि ते गावाकडे जात असताना, नांदूर गावाजवळ त्यांच्या मोटरसायकलवरील पिशवी पडली पिशवी पडलेले त्यांच्या निदर्शनास आले नाही ,ते तीन ते चार किलोमीटर पुढे गेले त्यानंतर गाडीला अडकवलेल्या पाठीमागच्या पिशवी कडे त्यांनी लक्ष दिले ,ती पिशवी दिसली नाही, ते घाबरून गेले तसेच ते वापस नांदूर घाट ला आले चौकशी केली ,परंतु काही पैसे सापडल्याचे कुणी दिसून आले नाही ,खूप प्रयत्न करून ते गावी परतले, त्यानंतर नांदूर घाट येथील भारतीय सैन्य दलात असलेले ईश्वर बोबडे यांनी फेसबुक पोस्टवर सांगितले की मला अशी रक्कम पिशवी सापडलेली आहे ज्यांची आहे, त्यांनी खात्री करून रक्कम घेऊन जावी आणि पोलीस चौकी नांदूर घाटला देखील कळवले सुभाष जाधव यांनी ईश्वर बोबडे यांना संपर्क केला असता, दोघांनी मिळून शहानिशा करून पोलीस चौकी नांदुरघाट यांच्या मध्यस्थीने रक्कम सुभाष जाधव यांची आहे का..? हे पाहण्यात आले त्या पिशवीमध्ये सुभाष जाधव यांची सातबारा देखील होती ,त्यामुळे हे स्पष्ट झाले, की पैसे सुभाष जाधव यांचे आहेत भारतीय सैन्य दलात असलेले ईश्वर बोबडे यांनी खरंच माणुसकीचे दर्शन घडून आणलेले दिसते, समाजामध्ये खरंच अशा मोठ्या विचारांची लोक आहेत ,असे त्यांनी सिद्ध करून दाखवले, या रकमेची शहानिशा नांदुर घाट बिट अंमलदार मुकुंद ढाकणे ,पोलीस नाईक शिवाजी सानप ,पोलीस नाईक सोनवणे यांनी शहानिशा केली व रक्कम देण्यात आली.
,
Leave a comment