बीड | वार्ताहर
बीड शहरातील किराणा सामानाची घरपोहच सेवा द्यावी असे आदेश जिल्हा प्रशासनाने जारी केले आहेत. संचारबंदी दरम्यान नागरिकांनी केवळ अत्यंत आवश्यक किराणा सामान तेल,गहू, तांदूळ, साखर इ. व वस्तूंचीच मागणी त्यांच्यासाठी नेमलेल्या किराणा दुकानदाराकडेच नोंदवावी अशा सुचनाही दिल्या गेल्या आहेत.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या या आदेशानुसार, संबंधित दुकानावर मागणी नोंदविल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वा. ते दु.१२ वाजेपर्यंत किराणा सामानाची घरपोहच डिलेव्हरी नियुक्त कर्मचाऱ्यामार्फत करण्यात येईल अशा सूचना संबंधित कर्मचारी व दुकानदारांना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी दुकानदारांशी बिलाविषयी चर्चा करावी आणि मगच मागणी नोंदवावी. दुकानदाराकडे ऑनलाईन सुविधा असेल तर त्याचा वापर करुनच व्यवहार करावा, अन्यथा कर्मचारी घरी सामान देण्यासाठी आल्यावर त्यांच्याकडे समक्ष रक्कम स्वत: एका पाकिटात भरून द्यावी. दुकानादारांनीही रक्कम काळजीपूर्वक हाताळावी. सर्वांनी चेहऱ्यावर मास्क-रुमाल बांधावा. तसेच सॅनिटायझर किंवा साबणाचा वांरवार वापर करावा. सामाजिक अंतर राखावे आणि कोव्हीड विषयक सर्व व खबरदारी घ्यावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
तर कर्मचाऱ्यांशी साधा संपर्क
बीडमधील नागरिकांचा त्यांच्या प्रभागातील दुकानदारांशी संपर्क होऊ शकणार नाही त्यांनी त्यांच्या प्रभाग क्रमांकाप्रमाणे संपर्क साधावा. प्रभाग क्रमांक १,९,१०,११ रुपकांत जोगदंड मो. ८८३०९४८५९४, प्रभाग क्रमांक २,७,८,६ महादेव गायकवाड- ८४४६७६७६१५, प्रभाग क्रमांक १२,१३,२२,२३,२४ भागवत जाधव- ९७६७४८९३८८, प्रभाग क्र. ३,४,५,१८,१९ भारत चांदणे- ९१३०९१८६२८ प्रभाग क्र. १४,१५,१६ प्रशांत ओव्हाळ- ७०२०५४३६५४ प्रभाग क्र. १७,२०,२१,२५ राजू वंजारे- ९३७०७६७४७६.
Leave a comment