बाधीत रुग्णाचा धारूर शहरात संपर्क
कारेगावच्या रुग्णामुळे डोंगरकिन्ही लॉक
बीड | वार्ताहर
जिल्ह्यातून गुरुवारी तपासणीसाठी पाठवलेल्या स्वॅबमध्ये धारूर येथील एक जण कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले.दरम्यान या रुग्णाचा शहरात प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष मोठ्या प्रमाणात संपर्क आल्याने आता संपुर्ण धारूर शहर बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जारी केला आहे. धारूर शहरातील इतर ठिकाणी कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून धारूर शहर अनिश्चित काळासाठी बंद करण्यात येऊन पूर्णवेळ संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
दरम्यान कारेगांव (ता.पाटोदा) येथे कोरोना विषाणूचा लागण झालेला 1 रुग्ण 26 मे रोजी आढळून आला होता. या रुग्णाच्या संपर्कातील तीन व्यक्ती दोन दिवसांनी म्हणजेच 28 मे रोजी कोरोना बाधीत आढळून आल्या आहेत. त्यापैकी एक रुग्ण डोंगरकिन्ही (ता.पाटोदा) येथे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष नागरिकांच्या मोठया प्रमाणात संपर्कात आल्यामुळे डोंगरकिन्ही गावही जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी कंटेटमेंट झोन म्हणून घोषित केले आहे.जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी याबाबत अहवाल सादर केल्यानंतर हा आदेश लागू करण्यात आला आहे. कोरोना रोखण्यासाठी डोंगरकिन्ही पुढील अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ बंद केले आहे.
Leave a comment