केज । वार्ताहर
केज येथील डॉक्टर सतीश वसंत तांदळे हे सध्या मुंबई येथील नायर रुग्णालयात कोरोणा रुग्णांनाचा उपचार करत आहे.मुंबई मध्ये कोरोणा चे रुग्ण वाढत आहेत कोरोणाच्या रुग्णांनावर यशस्वी व वेळेत उपचार व्हावेत या साठी शासनाने मुंबईतील अनेक हॉस्पिटल हे कोविड हॉस्पिटल म्हणून घोषित केले आहेत त्यामध्ये नायर हॉस्पिटलचा देखील समावेश आहे. नायर हॉस्पिटल मध्ये सध्या 1035 रुग्ण उपचार घेत आहेत गेली दोन महिन्यापासून डॉ सतीश तांदळे हे कोरोण रुगणांचे उपचार करत आपले कर्तव्य पार पाडत आहेत.
डॉ.सतीश तांदळे हे महाराष्ट्र राज्यव्यापी निवासी डॉक्टर संघटनेचे राज्य उपाध्यक्ष व नायर चे अध्यक्ष आहेत ही जबाबदारी देखील त्यांच्यावर असल्याने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील निवासी डॉक्टरांचे अनेक प्रश्न शासनाकडे मांडत त्यांच्या अडचणी सोडत आहेत. या संकट काळात अनेक डॉक्टरांना कोरोना रुग्णांवर उपचार करत असताना कोरोणाची लागण झाली आहे. त्यामध्ये हे डॉक्टर उपचार घेऊन बरे झाले व परत एकदा जिद्दीने कोरोणा रुग्णांनावर उपचार करत आहेत असे डॉ.सतीश तांदळे सांगत आहेत.कुटुंबापासून दूर राहून काम काम करण्यात काहीच अडचण वाटत नाही कारण जे रुग्ण बाधित झाले आहेत ते आमचं कुटुंबच आहे. त्यांचा उपचार करणे आमचं प्रथम कर्तव्य व आमचा धर्म आहे. हाच विचार करत करत संपूर्ण डॉक्टर सध्या या कोरोना संकटाशी लढत आहेत असेच आपल्या बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील डॉक्टर सतीश तांदळे हे नायर हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करत व महाराष्ट्र राज्यव्यापी डॉक्टर संघटनेच्या माध्यमातून कोरोना रुग्णांवर उपचार करत असलेल्या निवासी डॉक्टरांचे प्रश्न मार्गी लावत आपले कर्तव्य पार पाडत आहेत.कोरोनाच्या या संकटात आपल्या केजचा भूमीपुत्र डॉ.सतीश तांदळे हे देखील कोराना योद्धा म्हणून लढत आहेत.
Leave a comment