माजलगाव । वार्ताहर
सध्या देशातच नव्हे तर संपूर्ण जगात कोरोनाने विषाणू ने धुमाकूळ घातला आहे. कोरोना लढ्यात डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस, होमगार्ड, महसूल प्रशासनासोबतच शिक्षकही उतरले आहेत. शिक्षक हा नेहमीच राष्ट्रीय कार्यात अग्रेसर असतो. मग ती निवडणूक असो, किँवा जनगणना असो अशा वेगवेगळ्या प्रकारचे सर्व्हे असो सर्वच कार्यात शिक्षक मोलाचे कार्य करत असतांना दिसत असतात.
आता कोरोना वर मात करत मुलांना वर्क फ्रॉम होम अंतर्गत व्हाट्सऍप ग्रुपच्या माध्यमातून शैक्षणिक कार्य चालूच आहे. हे काम करत असतानाच इतरही कामे शिक्षकांना दिली जातात आणि प्रामाणिकपणे ते कार्य पार पडत आहेत. गेल्या दीड - दोन महिन्यापासून म. फुले विद्यालयातील खमर शेख, रमेश गिरी, मतीन शेख, सुधीर देशमुख, अभय राठोड, गणेश राठोर, कैलास कुंभार, राजाभाऊ शिवणकर, अरुण सोळंक, सुमेध घाडगे हे भावी पिढीला घडवणारे शिक्षक माजलगाव तालुक्यातील बंदोबस्तासाठी, पेट्रोल पंपावर, चेकपोस्टवर कोरोना योद्धे म्हणून लढत आहेत. माजलगाव तालुक्यातील सर्वच शाळेतील शिक्षक या महामारीच्या विरोधात लढ्यात उतरले आहेत. म्हणून शिक्षकांच्या या कार्याची दखल शासनाने घ्यावी ही अपेक्षा तालुक्यातील सर्वच शिक्षकातून होत आहे.
Leave a comment