किल्ले धारूर । वार्ताहर
धारूर शहरात कोरोनाचा प्रादूर्भाव रोकण्या साठी प्रभाग निहाय नियूक्त सुरक्षा समित्या प्रभावीपणे काम करत असून प्रशासनास सहकार्य करत आहेत प्रभाग 7 चे समितीने प्रभागात घरोघर जाऊन जनजागृती करून क्वांराटाईन मधील व्यक्तीनी नियमाचे पालन करण्याचे सुचन दिल्या.
धारूर शहरात कोरोना चा प्रादूर्भाव रोकण्या साठी शहरात प्रभाग निहाय सुरक्षा समित्या नियूक्त करण्यात आल्या असून या सर्वच समित्या प्रभावी पणे काम करून प्रशासनास सहकार्य करत आहेत प्रभाग 7 मध्ये पूणे, मुंबई, औरंगाबाद येथून आलेल्या व्यक्तीच्या भेटी घेऊन त्यांना होम कोरोन्टाईन राहाण्याच्या सुचना दिल्या तसेच कांही आजार असेल तर प्रभाग प्रमुख व प्रशासन यांच्याशी तात्काळ संपर्क साधण्यासाठी मोबाईल क्रमांक दिले. कोरोना बद्दल जनजागृती करण्यात आली व प्रशासनाचे सर्व नियमाचे पालन करा. प्रशासनास सहकार्य करा असे अवाहण करण्यात आले. या वेळी मुख्याधिकारी सुहास हजारे प्रभाग अ सुरक्षा समिती अध्यक्ष बाळासाहेब खामकर, डॉ.राम शिनगारे, दत्तात्रय शिनगारे, गणेश सावंत समन्वय अधिकारी फुन्ने मॅडम प्रभाग ब सुरक्षा समिती अध्यक्ष, भैया गोंन्ने अशोक नाना जाधव, रवी शिनगारे अतुल शिनगारे डॉ.मयूर सावंत, सचिन जाधव, विजय जाधव दादा निरके समन्वय अधिकारी श्रीकांत वडगावकर, माणिक लोखंडे, माणिक गायसमुद्रे उपस्थीत होते. समितीमध्ये डॉ.राम शिनगारे व डॉ.मयूर सावंत यांनी आरोग्यविषयी नागरिकांना माहिती दिली.
Leave a comment