41 पैकी 36 व्यक्तींचे रिपोर्ट आले निगेटिव्ह
बाधित रुग्णांमध्ये कारेगाव (ता.पाटोदा) येथील 3,
धारुर 1 तर पाटोदा शहरातील 1 जणांचा समावेश
बीड । वार्ताहर
बीड जिल्ह्यात आणखी 5 कोरोना बाधित रुग्ण निष्पन्न झाले आहेत. लातूरच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेल्या 41 पैकी 5 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. उर्वरित 36 अहवाल मात्र निगेटिव्ह आले आहेत त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. असे असले तरी दिवसेंदिवस जिल्ह्यात बाधित रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे.
बाधित रुग्णांमध्ये कारेगाव (ता.पाटोदा) येथील 3, धारुर 1 तर पाटोदा शहरातील 1 जणांचा समावेश आहे.
कोरोनाच्या निश्चित निदानासाठी बीड जिल्ह्यातील 41 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब गुरूवारी (दि.28) सकाळी 6.45 वाजता विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संशोधन लातूर येथे पाठविण्यात आले होते. यात जिल्हा सामान्य रुग्णालय 27, स्वाराती रुग्णालय अंबाजोगाई-1, ग्रामीण रुग्णालय आष्टी-3, उपजिल्हा रुग्णालय गेवराई-3 आणि परळी उपजिल्हा रुग्णालयातून 7 व्यक्तींच्या थ्रोट स्वॅबचा समावेश होता. रात्री हे रिपोर्ट जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले. त्यातील 5 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
बाधित रुग्णामुळे बेलापुरी बंद
बुधवारी बीड तालुक्यातील बेलापुरी येथील एका 23 वर्षीय व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर गावात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी बेलापुरी येथे कंटेटमेंट झोन जाहीर केला आहे.त्यामुळे हा परिसर आता अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आला असून पूर्णवेळ संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
Leave a comment