गेवराई । मधुकर तौर
शहरातील जायकवाडी परिसरात राहणार्या एका वृध्द इसमाने पत्नीचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना गुरुवारी (दि.28) रोजी घडली. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
गंधराबाई बप्पासाहेब घुले (वय अंदाजे 65 वर्ष) असे मृत महिलेचे नाव आहे. बाप्पासाहेब घुलेने पत्नी गंधराबाई हिस अगोदर काठीने मारहाण केली. नंतर डोक्यात दगड घालून तिचा खून केला. आरोपी पती मनोरूग्ण असल्याचे समजते. घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी स्वप्नील राठोड, गेवराई ठाण्याचे निरीक्षक पुरुषोत्तम चोबे यांच्यासह पोलीस कर्मचारी दाखल झाले. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह रुग्णालयात दाखल करण्यात आला असून पोलीसांनी आरोपी बप्पासाहेबला ताब्यात घेतले आहे.
Leave a comment