कांद्याला रास्त दर मिळण्यासाठी
आष्टी । वार्ताहर
लॉकडाऊन सुरू झाल्यापासूम कांदा भाव पडले असून शेतकरी वर्ग तोट्यात गेला आहे.त्यामुळे वआष्टी तालुक्यातील पिंपळा येथून कांद्याला रास्त भाव मिळावा म्हणुन पंतप्रधान नरेद्र मोदी हजारो पत्र पाठवण्यात आली असून किमान वीस रुपये दर देण्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे याच्या अध्यक्षतेखाली भारताचे पंतप्रधान नरेद्र मोदी यांना कांदा 20 रु किलोने केंद्र सरकारने खरेदी करावा म्हनुन एक लाख पत्र पाठवनार आहेत. यावेळी पिंपळा कांदा उत्पादक शेतकर्यानी पतप्रधान याना पत्र लिहीली आहेत. तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कांद्याचे पीक घेतले जाते.सध्या काद्याला पाच ते सहा रु किलो दराने बाजार भाव मिळतात. या भावाने साधा उत्पादन खर्च ही निघत नाही. त्यामुळे केंद्र सरकारने 20 रुपये दराने कांदा खरेदी करावा अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहे.यावेळी शेतकरी विलास खटके, संजय धायगुडे, चंदु शेंडगे,नामदेव शेंडगे, बाळकृष्ण दिंडे, रमाजजान बेग, संदीप लिंभोरे, अशोक भस्मे, विट्ठल भस्मे, भरत मेहेत्रे, अरुन काका, अमर मेहेत्रे, मच्छिद्र लकडे, नवनाथ चेमटे, भांड आदी शेतकरी यांनी पत्र लिहिले आहेत
Leave a comment