परिवारातील सदस्य डोंगरकिन्ही, रायमोह येथिल बाजारपेठेत फिरले आहेत
, तर ग्राहक सेवा केंद्रातुन पैसेही काढल्याचे बोलले जाते
डोंगरकीन्ही /वार्ताहर
दि२६ रोजी कोरेगाव तर पाटोदा येथिल एक ६९ वृध्द कोरोना संक्रमित आढळल्याने डोंगरकिन्ही व रायमोह येथे चिंता वाढली आहे. स्लॅब तपासणी साठी परिवारातील १३ सदस्य बीडला हलविले आहेत.
रेडझोन मुंबई येथुन कोरेगा व पाथर्डी येथिल एकुण ७४ जण आले होते त्यातील २२ जण कारेगाव येथे आले होते. यातील एका वृध्दास दि २१ तारखेस श्वसनाचा त्रास जाणवत असल्याने प्रा आ केंद्र डोंगरकिन्ही येथे डॉ भोंडवे मॅडम यांनी तपासले होते. त्यावेळी लक्षणे दिसत नव्हती मात्र बीडला जाण्याचा सल्ला दिला होता. मात्र हा रुग्न पॅराडाईज हॉस्पिटल व विवेकानंद हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल होता. विवेकानंद हॉस्पिटल ने बीड सिव्हीलला पाठवले.स्वॅब तपासणीत पॉझिटिव्ह सापडला अन कोरेगाव डोंगरकिन्ही, रायमोह, पॅराडाईज हॉस्पिटल, विवेकानंद हॉस्पिटल येथे चिंता वाढली. त्यातच यारुग्नाच्या पत्नीस त्रास जाणवल्याने डोंगरकीन्हीत खाजगी हॉस्पिटल येथे उपचार घेतले असल्याचे कळते आहे.डोंगरकीन्ही येथे पांगरी, जाटनांदुर, भिलारवाडी,भाटेवाडी ,डोंगरकिन्ही, नाळवंडी, जाधववाडी, मांडवेवाडी, उखळवाडी, धोपाटा मिसाळवाडी येथिल उपचारासाठी येत असतात दरम्यान कारेगाव येथिल लोक विशेषतः या परिवारातील सदस्य डोंगरकिन्ही, रायमोह येथिल बाजारपेठेत फिरले आहेत तर ग्राहक सेवा केंद्रातुन पैसेही काढल्याचे बोलले जाते. काही शेतीविषयक साहित्य रायमोहा येथुन खरेदी केली आहे. प्रा आ केंद्राचे वै अ मयूर शिंदे कारेगाव येथे तळ ठोकून आहेत. या परिवारातील एकुण १३ सदस्य स्लॅब तपासणी साठी बीडला हलविले आहे.
दरम्यान जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या आदेशाने कोरेगाव, उखळवाडी,जन्नेवाडी, मोरजळवाडी, भोसलेवस्ती, मुळीकवाडीत, नाळवंडी आदी गावे कन्टनमेंट झोन जाहीर केले.
फक्त नावालाच क्वारंनटाईन
कोरेगाव येथे मुंबई येथुन अनेक लोक आलेत. ते फक्त नावालाच क्वारंनटाईन होते. येथे गावात कुणीही मास्क लावत नाहीत.
सर्रास हातातहात देणे, गळाभेट घेणे, हात न धुणे, शासनाचे नियम पालन न करणे, जणु कोरोना यांचा पाव्हणा आहे.
Leave a comment