बीड | वार्ताहर
जिल्ह्यातून मंगळवारी पाठवलेल्या 30 पैकी सहा जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर परळी शिरूर कासार आणि पाटोदा तालुक्यातील 18 गावांमध्ये जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी कंटेनमेंट झोन घोषित केला आहे. परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आता ही गावे अनिश्चित काळासाठी बंद करत पूर्णवेळ संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
परळी तालूक्यातील हाळंब या गावापासून ३ कि.मी. परिसरातील हाळंब,हेळंब,खोडवा सावरगांव, भोजनकवाडी, दैठणाघाट व खोडवा सावरगांवतांडा हा परिसर कंटेटमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.
पाटोदा तालूक्यातील कारेगांव या गावापासून ३ कि.मी. परिसरातील कारेगांव, कारेगांव भोसलेवस्ती, कठाळवाडी, जन्नेवाडी, नाळवंडी तसेच शिरुर का. तालुक्यातील उखळवाडी, मोरजळवाडी व येवलवाडीनाथ (जानपीर) हा परिसर कंटेटमेंट झोन म्हणून घोषित केला गेला आहे. याशिवाय शिरुर कासार तालूक्यातील बारगजवाडी या गावापासून ३ कि.मी. परिसरातील बारगजवाडी,बडेवाडी, शेरेवाडी व उंबरमुळी ) हा परिसर कंटेटमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आली आहे. ही सर्व गांवे व परिसर पुढील अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ बंद करण्यात येवून संचारबंदी लागू करण्यात आला आहे.
Leave a comment