45 सदस्यांचे अंबाजोगाईत रक्तदान
अंबाजोगाई । वार्ताहर
डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाण (रेवदंडा ता.आलिबाग जि.रायगड) यांच्या मार्फत देशभरात विविध सामाजिक बांधिलकी जोपासत विविध उपक्रम राबविले जातात. सध्या अनेक ठिकाणी रक्ताचा तुटवडा जाणवत असल्यामुळे शासकीय यंत्रणेमार्फत रक्तदान करण्याकरीता आवाहन करण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर धर्माधिकारी प्रतिष्ठाणचे अध्यक्ष पद्मश्री डॉ.श्री.आप्पासाहेब धर्माधिकारी व श्री.सचिनदादा धर्माधिकारी यांच्या नेतृत्वाखाली अंबाजोगाई येथे स्वा.रा.ती.ग्रा.रूग्णालय या ठिकाणी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात प्रतिष्ठाणच्या 45 सदस्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिलेल्या सर्व सुचनांचे काटोकोरपणे पालन करून, मास्क तसेच सॅनिटायझर वापरून,फिजीकल डिस्टन्स पाळून आणि शासकीय रक्तपेढीतील डॉक्टरांच्या पुर्व परवानगीने दि.23 मे आणि 26 मे 2020 या दोन दिवशी प्रतिष्ठाणच्या अंबाजोगाई, परळी, पाटोदा, बोरी सावरगांव येथील 45 सदस्यांनी नियोजित ठिकाणी जाऊन रक्तदान केले. या शिबीराचे उद्घाटन डॉ.केदार कुटे यांनी केले. तर शिबिराच्या यशस्वितेसाठी डॉ.शशिकांत पारखे, डॉ.जगदीश रामदास, परीचर श्रीराम कुंजटवाड या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.
----
Leave a comment