11 शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू

माजलगाव । वार्ताहर

आमदार प्रकाश सोळंके यांच्या पाठपुराव्यामुळे मतदारसंघांतील कापूस उत्पादन करणार्‍या शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मंगळवार दि.26 मे पासून मतदारसंघात 11 शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू झाली आहेत. आता दररोज माजलगांव, धारूर, वडवणी येथील 800 शेतकर्‍यांच्या कापसाची मापे  होणार आहेत. दरम्यान, ही नवी कापूस खरेदी केंद्रे सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

माजलगाव मतदारसंघाचे आ.प्रकाश सोळंके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री, पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे पाठपुरावा केल्याने प्रतिक्षेत असलेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे पावसाळ्याचे दिवस तोंडावर येऊन ठेपल्याने शेतकर्‍यांचे नुकसान होवू नये यासाठी शासकीय कापूस खरेदी केंद्र यासाठी माजलगावतील पूर्वा, महाराष्ट्र पात्रुड, अभिनंदन, पी एस.कॉटन, अंबादास, मनकॉट, मोरेश्‍वर या जिनिंग तर धारूरमध्ये चार जिनिंगवर शासकीय कापूस खरेदी सुरू झाली आहे. तसेच माजलगाव बाजार समितीच्या टीएमसी आवारामध्ये शेतकर्‍यांना एक दिवस अगोदर फोनद्वारे कल्पना देऊन बोलविले जाते व तेथून  जिनिंग वर जाण्यासाठी टोकन दिले जाते माजलगाव तालुक्यातील 3 हजार 156 शेतकरी कापसाच्या मापाच्या प्रतिक्षेत आहेत. तर वडवणी व धारूर तालुक्यात शेतकरी प्रतिक्षा यादीवर आहेत या सर्व शेतकऱ्यांच्या मागणीचा आणि समस्येचा विचार करून करून नव्या 11 जिनिंगला कापूस खरेदीसाठी  मंगळवार पासून परवानगी दिली आहे  दरम्यान, आ.प्रकाश सोळंके यांच्या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांचा मोठा प्रश्‍न सुटला आहे अशा प्रतिक्रिया कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडून उमटत आहेत. नोंदणीकृत शेतकरी बांधवांनी बाजार समितीकडून संपर्क झाल्यास आपला कापूस टीएमसि आवारामध्ये घेऊन यावा व तेथे आल्यानंतर सोशल डिस्टन्ससिंगचे सर्व नियम पाळावेत व तसेच काही अड़चन आल्यास थेट बाजार समितीशी संपर्क साधावा असे आवाहन सभापती अशोक डक यांनी केले आहे. 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.