बीडमध्ये धनंजय वाघमारेंकडून पन्नास
दिवसांपासून शेकडो गरजूंना दोनवेळेसचे अन्नदान
बीड । वार्ताहर
धनंजय वाघमारे यांचा कौतुकास्पद उपक्रम, कसलाही गाजावाजा न करता गेल्या 50 दिवसांपासून दररोज शेकडो लोकांना 2 वेळेचे घरपोच जेवण आणि गरीब व मजुरी करणार्या गरीब कटुंबाला किराणा सामानाचे वाटप आणि हजारो मास्कचे वाटप ते त्यांच्या चंपावती सामाजिक प्रतिष्ठाण, बीड या त्यांचा प्रतिष्ठाणच्या माध्यमातून करत आहेत.
कोरोनाच्या वैश्विक लढ्यात सामाजिक भान जपणारे अनेकजण आपापल्या परीने लढा देत आहेत. कित्येकांनी गरिबाच्या पोटाची भूक भागवण्याचे उत्तरदायित्व आपल्या खांद्यावर घेत आपापल्या परीने अन्नपूर्णा आपल्या घरात - अंगणात साक्षात उभी केली आहे.याचाच प्रत्यय बीडमध्येही आला आहे. बीड भागातील धनंजय वाघमारे यांच्या रूपाने! ते गेले 50 दिवस शेकडो गोरगरीब गरजूंची भूक शमवत आहेत, तेही कसलाही गाजावाजा न करता, प्रसिद्धीपासून दूर राहून. त्यांनी गेले वीस दिवस दररोज नागरिकांना स्वखर्चाणे अविरत जेवणाचे डबे पुरवत आहे आणि किराणा सामानाचे वाटप करीत आहेत. तसेच त्याचा कडून स्वखर्चातून जो पर्यंत डबे व किराणा सामान त्यांना देता येईल तो पर्यंत मी देईन अस त्यांचा मानस आहे. बीड भागात हातावर पोट असलेले, मोल मजुरी करून जगणारे, छोटे गरीब व्यवसायिक असे असंख्य कुटूंब आहेत. लॉक डाऊन मुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. अशा स्थितीत धनंजय वाघमारेंनी मदतीचा यज्ञ अखंड सुरू ठेवला आहे. दररोज स्वखर्चाने त्यांच्या मित्रपरिवाराच्या मदतीने लोकांचे 2 वेळेचे जेवण देऊन आणि किराणा सामानाचे वाटप ते आपल्या भागातील गरजू नागरिकांना घरपोच वाटप करत आहेत. व हजारो मास्कचे वाटप करीत आहेत.
ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a comment