प्रशासनाच्या नियमांचे काटेकोर पालन
किल्लेधारूर । वार्ताहर
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी काढलेल्या नवीन आदेशानंतर शहरात केश कर्तनालये व इतर छोटे व्यवसाय सुरु झाली असून प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे स्वंयस्फुर्तिने पालन होत असल्याचे दिसुन येत आहे.
तब्बल दोन महिन्यापासून बंद असलेले केश कर्तनालय व इतर छोटे व्यवसाय सुरु झाल्याचे दिसून आले. दोन महिन्यापासून व्यवसाय बंद असल्याने नाभिक समाज व छोटे व्यवसायिक अडचणीत होते. जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी सुधारित आदेश जारी करत केशकर्तनालय, ब्युटी पार्लर व तत्सम व्यवसायांना सकाळी 7.30 ते सांयकाळी 6.30 पर्यंत उघडण्याची परवानगी दिली. यामुळे केशकर्तनालय काल रात्री संपुर्ण निर्जंतूकीकरण करण्यात आली होती.यासोबतच इतर छोट्या व्यवसायिकानीही आपापल्या आस्थापना स्वच्छ करत व्यवसाय सुरु केली. सोशल डिस्टंटींग पाळत दुकानात युज न्ड थ्रो वस्तूचा वापर, कचरा पेटी व सनिटायझर ठेवल्याचे निदर्शनास आले. स्वच्छतेची सर्व नियम पाळण्याचे आदेशाचे पालन करण्याकडे व्यवसायिकानी स्वंयस्फुर्तिने काळजी घेतल्याचे दिसत आहे. सकाळ पासुनच केशकर्तनालय व चहा स्टॉलवर ग्राहक नियमांचे पालन करुन वळत असल्याचे दिसत आहेत. बँकाही पुर्णवेळ सुरु असल्याने समाधान व्यक्त होत आहे. सुधारित आदेशात मुबलक वेळ असल्याने तुरळक ग्राहकच रस्त्यावर दिसुन येत आहेत.
Leave a comment