विक्रीसाठी प्रशासनाकडून वेळ देणार
गेवराई । वार्ताहर
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात ईटकूर येथे कोरोनाचे रुग्ण आढळुन आल्यामुळे परिसरातील काही गावांना बफर झोन तर काही गावांना कँटेनमेंट झोन मध्ये टाकून अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू केली असून या गावातील शेतकर्यांनी सध्या कापूस व इतर माल विक्रीसाठी आताच बाहेर पडू नये यासाठी प्रशासनाच्या वतीने त्यांच्या माल विक्रीसाठी तारीख व ठरवून देण्यात येणार असून शेतकर्यांनी चिंता करण्याचे कारण असे अवाहन नायब तहसीलदार प्रशांत जाधवर यांनी केले आहे.
बीड जिल्ह्यात गेवराई तालुक्यातील ईटकुर येथे कोरोनाचा रुग्ण आढळून आल्यानंतर परिसरातील चार गावांना कँटेनमेंट झोन तर सहा गावांना बफर झोन मध्ये अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आलेली असून या गावातील अनेक शेतकर्यांनी आपल्या कापूस, तूर इतर शेती माल विक्रीसाठी नोंदी केलेल्या आहेत. मात्र त्या परिसरात पूर्णवेळ संचारबंदी असल्याने त्यांच्या शेतीमाल विक्रीसाठी प्रशासनाच्या वतीने वेळ ठरवून देण्यात येणार आहे. तोपर्यंत या परिसरातील गावातील शेतकर्यांनी या परिस्थितीत बाहेर पडू नये असे आवाहन नायब तहसीलदार प्रशांत जाधवर यांनी केले आहे.
Leave a comment