जिल्ह्यातील उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या 41
बीड | वार्ताहर
जिल्ह्यातील 57 पैकी 50 जणांचे रिपोर्ट सोमवारी निगेटिव्ह आले होते. प्रलंबित 7 रिपोर्ट आज मंगळवारी (दि.26) दुपारी जिल्हा रुग्णालय प्रशासनाला प्राप्त झाले असून 5 अहवालांचा कोणताही निष्कर्ष निघाला नाही तर 2 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.त्यामुळे आता बीड जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या एकूण रुग्णांची संख्या 41 झाली आहे. बाधीत 2 रुग्ण मुबंई येथून आले होते, शहरातील दिलीपनगर येथील रहिवासी असल्याचे ते सांगतात अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.
कोरोना रूग्णाच्या संपर्कात आलेले आणि या आजाराची लक्षणे दिसणाऱ्या 55 जणांचे स्वॅब सोमवारी तपासणीसाठी लातूरच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. यामध्ये बीड जिल्हा रूग्णालयातून 34, गेवराई 3, माजलगाव 15, आष्टी 3 अशा एकूण 55 रूग्णांच्या स्वॅबचा समावेश आहे. अन्य ठिकाणावरून 2 जणांचे असे 57 नमुने तपासणीसाठी पाठवले होते. यातील 50 जणांचे स्वब रिपोर्ट सोमवारी निगेटिव्ह आले होते तर 7 जणांचे अहवाल प्रलंबित होते. मंगळवारी ते प्राप्त झाले असून 2 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह तर पाच अहवालाचा कोणताही निष्कर्ष निघालेला नाही.
30 अहवालांची प्रतीक्षा
दरम्यान मंगळवारी जिल्ह्यातून 30 जणांचे स्वॅब तपासणीला पाठवण्यात आले आहेत, त्याचे अहवाल अद्याप जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेले नाहीत असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
Leave a comment