मुस्लिम बांधवांनी घरात नमाज अदा करत दिल्या शुभेच्छा
बीड । वार्ताहर
मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान ईदचा सण यंदा कोरोनाच्या सावटाखाली साजरा करावा लागला. जिल्ह्यात टाळेबंदी असल्यामुळे तसेच सामाजिक अंतराचे पालन करणे गरजेचे असल्याने ईदगाहमध्ये ईदची नमाज अदा करता आले नाही. त्यामुळे मुस्लिम समाज बांधवांनी साध्या पध्दतीने घरीच नमाज अदा करून ईदचा सण साजरा केला.
यंदा रमजान ईदचे रोजे सुरू होण्यापूर्वीपासून लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे मुस्लिम बांधवांना एकत्र येता आले नाही. सोमवारी पवित्र रमजान ईदची नमाजही घरातच अदा करावी लागली. सर्व मुस्लिम बांधवांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करत ईदचा सण आनंदात शांततेने साजरा केला. पहिल्यांदाच ईदचा सण मित्र व आप्तेष्टांशिवाय साजरा करावा लागला. मात्र कोरोनाचे संकट लक्षात घेवून मुस्लिम बांधवांनी आनंदात एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.घरोघरी गुलगुले आणि शिरकुर्माचा आस्वाद घेण्यात आला.
Leave a comment