नेकनूर । वार्ताहर
प्रशासनाच्या वेगवेगळ्या आदेशाने ग्रामीण भागातील अनेक गावांची मागच्या दोन महिन्यात मोठी अडचण झाली. जिल्ह्याच्या सीमेवरच्या गावासाठी उभे राहिलेले चेकपोस्ट या गावांसाठी डोकेदुखी बनली महत्त्वाचा कामांनाही येथील ग्रामस्थांना या परिस्थितीने अडचणीत आणले.
दुसर्या जिल्ह्यांच्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील इतर ठिकाणची बाजारपेठ सुरू झाली असताना या गावांना बफर झोनच्या कटकटीमुळे मूलभूत अत्यावश्यक गोष्टींनाही मुकावे लागले.विशेष म्हणजे ज्या कळंब तालुक्याने ही गावे बफर झोन मध्ये आणली तेथील बाजारपेठ मात्र सुरू झाली आपल्याकडे मात्र दोन दिवसापूर्वीच बोरगाव चेकपोस्टवर कृषी विक्रेत्याच्या खतांच्या गाड्या परत पाठवल्या गेल्या. पावसाच्या तोंडावर खते परत गेल्याने दोन महिन्यापासून रुग्ण जवळपास नसतानाही बाहेर जाण्यापासून रोखल्या गेलेल्या बोरगाव बु. ग्रामस्थांत तीव्र नाराजी पसरली होती. तालुकास्तरावरील अधिकारीही ग्रामीण भागातील परिस्थितीची जाणीव असताना वरिष्ठांच्या आदेशाने बांधले गेल्याने बफर झोन गावांमधील नागरिकांना मोठ्या समस्या निर्माण झाल्या होत्या. सर्वत्र नवीन आदेशाने सकाळी ते सायंकाळपर्यंत बाजारपेठ उघडणार असल्याने आतातरी चेकपोस्ट वरील निर्बंध हटवून दोन महिन्यापासून अडकून पडलेल्या गावांना मोकळीक द्यावी अशी मागणी अशा गावातील नागरिकातून होत आहे.
Leave a comment