माजलगाव। वार्ताहर
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सोमवारी जिल्हावासीय करिता नवीन आदेश जारी करताना केश कर्तनलाय व दारू दुकानाना परवानगी देतानाच बाजारपेठ 11 तास उघडी ठेवण्याची परवानगी दिली आहे. मात्र यामुळे माजलगाव शहरासह परिसरातील व्यापारी वर्गात खुशीचे वातावरण असून अनेक सुज्ञ नागरिकांनी मात्र या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.
जिल्हाधिकारी यांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करताना जो पर्यंत जिल्ह्यात कोरोना संसर्ग होण्याचा धोका नव्हता तेव्हा संचरबंदी सह बाजारपेठ बंद होती आणि आज जेव्हा कोरोना संसर्ग होण्याचा धोका वाढला आहे तेव्हा मात्र पार्लर उघडणे तसेच बाजारपेठ 11 तास उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . याबाबत जिल्हाधिकारी यांनी पुनर्विचार करण्याबाबत नागरिकांत चर्चा होती.तर मागील 2 महिन्यापासून घरून किराया भरण्या सोबतच मालाचे झालेले नुकसान तसेच इतर बाबी बाबत निर्णय घेता येईल असे मानून व्यापारी वर्गात आनंदाचे वातावरण होते.
Leave a comment