धारूर । वार्ताहर
पुणे येथून आलेले एक कुटुंब अकरा दिवसापासून शेतात क्वांरटाईनवर होते या कुटूंबास कुठलीच मदत होत नसल्याने उपासमारीची पाळी येत होती. सहायक समाज कल्याण आयुक्त व मराठवाडा लोक विकास मंच यांचे वतीने त्यांना जीवनावश्यक वस्तूचे किट देण्यात आले व शिक्षणा बद्दल माहीती देण्यात आली.
मोरफळी येथे कुटुंब थांबलेल्या ठिकाणी कोणतीही व्यवस्था नाही. ना पाणी, ना रेशन, निवाराही नाही, रात्री रानडुकरांच सुळसुळाट आहे. त्यामुळे लहान मुलांच्या जीवाला धोका आहे. त्यांना जागरण करावे लागत आहे. याची दखल घेत सहायक समाज कल्याण आयुक्त सचिन मडावी व बालकामगार प्रकल्प संचालक ओमप्रकाश गिरी मराठवाडा लोकविकास मंचचे बाजिराव ढाकणे, पत्रकार अनिल महाजन हे त्या कुटूंबाला पुढील एक महिना पुरेल इतके अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तू घेऊन पोहोचले व गावाबाहेर शेतात जाऊन त्या कुटुंबाला मदत पोहोच केली. त्यांच्यासोबत चर्चा करुन त्या कुटुबाचे मनोबल वाढवले. याची दखल गावचे सरपंच शेषेराव गडदे यांनी घेऊन त्यांची पाण्याची व्यवस्था केली. या मदतीमुळे कुटुंबातील लहान थोरांच्या मुखावर हास्य तरळले.त्यांनी या टिमचे कौतुक केले.
Leave a comment