किल्लेधारूर । वार्ताहर
धारुर शहर व तालूक्यात मुस्लिम समाजाच्या वतीने साध्या पध्दतीने ईद ऊल फित्र घरी नमाज अदा करुन साजरी करण्यात आली. शुभेच्छा देण्यासाठी भ्रमणध्वनी व समाज माध्यमाचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आला.
कोरोनाच्या जागतिक संकटामूळे अनेक सण उत्सवावर अवकळा आली. आज देशात सर्वत्र रमजान ईद साजरी होत आहे. आनंद, स्नेह व मैत्रीला दृढता देणार्या स्नेहभाव जपून सर्व धर्मियांना आलिंगन देणार्या ईद उल फित्र वरही कोरोनाचा प्रभाव होता.इतिहासात पहिल्यांदा घरात मित्र व आप्तेषांशिवाय ईद साजरी झाली. ईदनिमित्त घरातील सर्व मंडळी एकत्रित येत अनेकांनी नफील चास नमाज तर ठराविक लोकांनी मजिदमध्ये सकाळी लवकरच इदची नमाज अदा केली.यावेळी जगभर पसरलेल्या कोरोना पासुन मानवजातीचे रक्षण करण्यासाठी अल्लाहकडे दुवा मागण्यात आली.ईद घरात साजरी करण्याचे आवाहन मुस्लिम धर्मगुरुसह प्रशासनाने केले होते. त्यास उत्तम प्रतिसाद देत अगदी साध्या पध्दतीने ईद साजरी झाली.यानंतर बहुतांशी समाज माध्यमातून एकमेकास शुभेच्छा देण्यात आल्या.
Leave a comment