रक्तदात्यांनी नोंदणी करण्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून आवाहन
गेवराई । वार्ताहर
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर राज्यात रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर जाणवू लागला आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नुकतेच रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस माजी आ.अमरसिंह पंडित यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने गेवराई तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, जयभवानी शिक्षण प्रसारक मंडळ आणि र.भ.अट्टल महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दि.29, 30 व 31 मे रोजी र.भ.अट्टल महाविद्यालय, गेवराई येथे सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. संदीप मडके (9403900095) आणि अक्षय पवार (9604783939) यांच्याकडे रक्तदात्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर यांनी केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस माजी आ.अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाच्या संकट काळात आरोग्य विभागाला तीन व्हेंटीलेटर उपलब्ध करण्यात आले असून गेवराई शहरातील पाच हजार गरजूंना जीवनाश्यक वस्तूंचे किट यापूर्वी वाटप करण्यात आले आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत राज्यातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेवून रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. सोशल डिस्टन्सिंग व इतर नियमांचे पालन करताना या शिबीराचे दि.29, 30 व 31 मे या तीन दिवस करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधान परिषद सदस्य आ.सतिष चव्हाण यांच्या शुभहस्ते दि.29 मे रोजी रक्तदान शिबीराचे उद्घाटन होणार आहे. रक्तदान शिबीरासाठी रक्तदात्यांव्यतिरिक्त इतरांनी गर्दी करू नये, प्रती अर्ध्या तासाला पाच रक्तदात्यांना बोलावून त्यांचे रक्तदान होणार आहे. त्यामुळे इच्छुक रक्तदात्यांनी गेवराई तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोशल मिडीया सेलचे तालुकाध्यक्ष संदीप मडके (9403900095) आणि गेवराई तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अक्षय पवार (9604783939) यांच्याकडे तात्काळ नोंदणी करण्याचे आवाहन तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
माजी आ.अमरसिंह पंंडित यांच्या वाढदिवसानिमित्त तीन दिवस रक्तदानाचा महायज्ञ सुरु राहणार असून जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी दि.31 मे रोजी एक्स-रे मशिन, तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना ई.सी.जी. मशिन, नेब्युलायजरसह पी.पी.ई.किट आणि एन-5 मास्क उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्याचा फायदा रुग्ण सेवेसाठी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. गेवराई तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून सर्व उपक्रम यशस्वीपणे राबविले जातील यासाठी रक्तदात्यांनी आपली नोंदणी तातडीने करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी जालिंदर पिसाळ, मुजीब पठाण, सुनिल पाटील, डॉ.घाडगे, बाबासाहेब आठवले, सुभाष महाराज नागरे, शेख सलीम, गोरख शिंदे, कुमार ढाकणे, हन्नानसेठ, दिपक वारंगे यांच्यासह राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ऋषिकेश बेदरे, शहराध्यक्ष दिपक आतकरे, युवकचे शहराध्यक्ष गुफरान इनामदार, अल्पसंख्यांक सेलचे खालेद कुरेशी, नवीद मशायक, शांतीलाल पिसाळ, अॅड.स्वप्नील येवले, सेवा दलचे अज्जू सौदागर, किसान सेलचे सुभाष मस्के, डॉक्टर सेलचे सुहास घाडगे, ओबीसी सेलचे मदन लगड, भटका सेलचे बाबासाहेब चव्हाण, सरपंच सेलचे रमेश नेहरकर, कामगार सेलचे शेख मन्सुर, उपाध्यक्ष दत्ता दाभाडे, सय्यद अलीम, रविंद्र दाभाडे, राहुल मोटे, रविंद्र शिर्के, नजीर कुरेशी यांसह पक्षाचे पदाधिकारी रक्तदान शिबीराच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत.
Leave a comment