जिल्हाधिकाऱ्यांचे नवे आदेश जारी
बीड | वार्ताहर
बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सोमवारी (दि.25) सायंकाळी सुधारित आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार आता बीड जिल्ह्यात आजपासून सर्व आस्थापना- दुकाने सकाळी ७.३० ते सायंकाळी ६.३० वा. पर्यंतच्या कालावधीत दररोज चालू राहतील.
जिल्हाधिकारी यांच्या सुधारित आदेशानुसार, क्रिडासंकुले, क्रिडांगणे व इतर सार्वजनिक खुल्या जागा या वैयक्तीक व्यायामासाठी खुल्या राहतील, परंतू प्रेक्षक व सामुहिक क्रिडा/ व्यायाम कृतींना परवानगी राहणार नाही. सर्व शारिरिक कसरती, व्यायाम व तत्सम कृतींना कोरोना विषयक सर्व नियमावली आणि सामाजिक अंतराविषयक नियमांचे पालन करण्याचे अटीवर परवानगी देण्यात येत
आहे. सर्व सार्वजनिक व खाजगी वाहतूक करणारे व्यक्तींना खालील प्रमाणे प्रवासी वाहतूकीचे नियम पाळून वाहने वापरता येतील. दुचाकी 1 चालक, तीन चाकी - चालक + दोन प्रवासी .चार चाकी :- चालक + दोन प्रवासी
जिल्हयांतर्गत बस सेवेला केवळ ५० टक्के प्रवासी क्षमतेसहच परवानगी देण्यात येत आहे. सदरील बसमध्ये सामाजिक अंतर आणि कोव्हीड-१९ विषयक स्वच्छतेचे सर्व नियम पालणे बंधनकारक राहतील.जिल्हा बाहेरील बस सेवे संदर्भात शासनाचे आदेश आल्यावर वेगळे आदेश निर्गमित करण्यात येतील.बार व दारु दुकानांना परवानगी देण्यासाठी स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येत आहेत.पानटपरी, तंबाखू.गुटखा,पानमसाला, खर्रा व तत्सम सर्व बाबींच्या विक्री आणि सार्वजनिक ठिकाणी सेवनास बंदी कायम राहील.
सर्व केश कर्तनालये, व्यूटी पार्लर व तत्सम दुकानांना सुरु करण्यास परवानगी देण्यात येत असून सर्व ठिकाणी सामाजिक अंतर कोव्हीड-१९ विषयक स्वच्छतेचे नियम पाळणे बंधनकारक राहतील. कंटेटमेंट व बफर झोन घोषित केलेल्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशानुसारच व्यवसायांना परवानगी राहील. संध्याकाळी ७ वा. ते सकाळी ७ वा. काळामध्ये जीवनावश्यक सेवाशी संबधित व्यक्ती व्यतिरिक्त इतर कोणतीही व्यक्ती पास असूनही घराबाहेर राहू शकणार गाही. ६५ वर्षापेक्षा जास्त वयाच्या व्यक्ती ज्यांना जुने आजार आहेत. (रक्तदाब, मधुमेह , इतर तत्सम गंभीर विकार, मोठया शस्त्रक्रिया झालेल्या व्यक्ती इ.) गर्भवती महिला, १० वर्षाखालील वयाची मुले व मुली यांना जीवनावश्यक सेवा व्यतिरिक्त इतर कोणत्याही कारणासाठी घराबाहेर कधीही पडता येणार नाही.
कोणत्याही दुकानामध्ये पाच पेक्षा जास्त व्यक्ती असू नये आणि त्या प्रत्येक व्यक्तीमध्ये किमान 6 फुट अंतर असावे, ही दुकानदारांची वैयक्तीक जबाबदारी असेल.आजपासून सर्व आस्थापना/दुकाने सकाळी ७.३० ते सायंकाळी ६.३० वा. पर्यंतच्या कालावधीत दररोज चालू राहतील. बॅकांनी शासनाने ठरवून दिलेल्या वेळेप्रमाणे काम करावे. सदरील ठिकाणी गर्दी झाल्यास अथवा सामाजीक अंतर राखले न गेल्यास सक्षम प्राधिकारी त्वरीत अस्ते दुकाने/ मार्केट पूढील आदेशापर्यंत बंद करतील आणि उपस्थित नागरिक व दुकानदारांवर कडक कारवाई करण्यात येईल. या विषयी सर्व दुकानदार व नागरिकांनी काळजी धेणे बंधनकारक आहे. सर्वच नागरिकांनी आता अतिशय जबाबदारीने वागणे आवश्यक आहे.परवानगी दिलेल्या वेळेत परवानगी दिलेली कामे करण्यासाठी पासची गरज राहणार नाही.सदरील आदेश दिनांक ३१ मे २०२० रात्री १२ वा पर्यंत लागू राहतील असे जिल्हाधिकारी यांनी या आदेशात नमूद केले आहे.
Leave a comment