बीड | वार्ताहर
टाळेबंदी सुरु झाल्यापासून बीड जिल्ह्यात वेगवेगळ्या ठाण्यात तब्बल 3400 आरोपींविरूद्ध 1001 गुन्हे दाखल करण्यात आले. याशिवाय विविध ठिकाणच्या कारवाईत 581 गुन्ह्यात 76 लाखांची दारू जप्त केली गेली. सोमवारी (दि.25) पोलिस प्रशासनाने ही माहिती दिली.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जिल्ह्यात साथरोग प्रतिबंध कायदा 1897 तसेेेच जमावबंदी व संचारबंदी लागू केेलेेली आहे. जिल्हा अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी या सर्व आदेशाचे व अधिसूचनांचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाईचे आदेश ठाणेदारांना दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात आजपर्यंत वरील कारवाया करण्यात आल्या.
शनिवारी (दि.23) 43 जणांवर भादंवि 188 प्रमाणे 20 गुन्हे दाखल करण्यात आले तर हातभट्टी दारूच्या एकूण 19 अड्ड्यावर धाडी टाकून 22 आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करून 1 लाख 27 हजार 882 रू.किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. रविवारी (दि.24) रोजी 25 जणांवर वेगवेगळे 18 गुन्हे दाखल करण्यात आले तसेच वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत दारू अड्ड्यावर छापे टाकून 12 जणांवर गुन्हा दाखल केला गेला. त्यांच्याकडून 1 लाख 5 हजार 298 रू.किमतीचा मुद्देमाल जप्त केला
76 लाखांची दारू जप्त
टाळेबंदी सुरु झाल्यापासून दि.24 मे पर्यंत जिल्ह्यात वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अधैध दारू विक्रेते, हातभट्टी दारू बनविणाऱ्या लोकांच्या एकूण 581 अड्ड्यावर पोलिसांनी छापे टाकले. या कारवायात 729 आरोपीविरुध्द दारूबंदी कायद्यानुसार 581 गुन्हे दाखल करून 76 लाख 60 हजार 248 रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
Leave a comment