परळी । वार्ताहर
कोरोना या जागतिक महा संकटापासून सुटका करून घेण्याचे सर्व नियम केंद्र व राज्य सरकारने तयार केले आहेत परंतु काही समाजकँटक हे नियम पायदळी तुडवून मोकाट फिरत कोरोनाला पोषक वातावरण निर्माण करत आहेत अशी खंत लोकनेते प्रा.टी.पी. मुंडे यांनी व्यक्त करून प्रशासनाच्या संचार बंदीचे नियम पाळा तरच कोरोना संपेल नाहीतर आपण संपू अशी भीती व्यक्त केली तसेच आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोना वर मात करण्यासाठी आणि नागरिकांना अत्यावश्यक सेवा पुरवणारे प्रशासनातील अधिकारी वर्ग, पोलीस, डॉक्टर, नर्स, वॉर्ड बॉईज, स्वच्छता कर्मचारी व आशा वर्कर्स यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून आभार मानले.एका पत्रकाच्या माध्यमातून प्रा.टी.पी.मुंडे सर यांनी र----विवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत गाव, वस्ती, तांडा, शहर, नगर, राज्य व देश दिव्याच्या प्रकाशाने उजळून एकात्मतेचे दर्शन घडविले याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. केंद्र व राज्य सरकारने कोरोना संकटापासून सुटका होण्याची अनेक उपाय चालविले आहे. लॉक डाऊन, सोशल डिस्टन्ससिंग, जमाबंदी, संचारबंदी हे प्रभावी औषध असले तरी काही जण मोकाट फिरताना दिसत आहेत व दारात आलेल्या कोरोना संकटाला घरात घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. या जागतिक महामारी च्या कोरोना संकटाला जात-पात-धर्म पंथ काहीही नाही त्यावर औषधही नाही मानवतेच्या दृष्टिकोनातून सरकारच्या नियमांचे पालन करणे हा एकमेव पर्याय आपल्यासमोर आहे त्यामुळे जनतेने घरातच बसावे लहान- सहान कामासाठी वारंवार बाहेर पडू नये असे आवाहन केले आहे व संचारबंदीत मोकाट फिरणार्यांना आपल्या पोलिसी खाक्या दाखवा. कोरोना संकटापासून सर्व जनतेला वाचविण्यासाठी रात्रंदिवस परिश्रम घेणारे पोलीस, महसूल, आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचे या संकट काळातील योगदान अतुलनीय आहे. त्या सर्वांचे आभार व्यक्त करून जनतेने त्यांना सहकार्य करावे असे आवाहन प्रा.टी.पी.मुंडे यांनी केले आहे.
Leave a comment