संपूर्ण उत्तर प्रदेशात अलर्ट जारी

नवी दिल्ली । वृत्तसेवा

देशात एकीकडे कोरोनाचं संकट दिवसेंदिवस वाढत असताना दुसरीकडे आणखी एक संकट भयानक होत चाललं आहे. उभ्या पिकांवर टोळ किटकांनी हल्ला केला आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेशानंतर आता टोळ कीटक उत्तर प्रदेशच्या दिशेने जात आहेत. राज्यातील अनेक जिल्हे टोळच्या जाळ्यात सापडले आहेत. यामुळे उत्तर प्रदेश सरकारला संपूर्ण राज्यात अलर्ट जारी करावा लागला आहे.

टोळांचा झुंड एप्रिलच्या दुसर्‍या आठवड्यात पाकिस्तानहूनराजस्थानला पोहोचला. राजस्थानातील 18 आणि मध्य प्रदेशातील जवळपास 12 जिल्ह्यांतील पिकांचे नुकसान करुन ते आता उत्तर प्रदेशातील झांसी आणि आग्रापर्यंत पोहचला आहे. ही समस्या इतकी मोठी आहे की उत्तर प्रदेश सरकारने संपूर्ण राज्यात सतर्कतेची घोषणा केली आहे. टोळांनी उत्तर प्रदेशातील 17 जिल्ह्याला जाळ्यात ओढलं आहे. यात आग्रा, अलीगड, मथुरा, बुलंदशहर, हाथरस, एटा, फिरोजाबाद, मैनपुरी, इटावा, फारुखाबाद, कानपूर, झांशी, हमीरपूर आणि ललितपूरदेखील समाविष्ट आहे.

उत्तर प्रदेश कृषी विभागाच्या अधिकार्‍यांच्या  म्हणण्यानुसार, टोळांचा मोठा झुंड एका तासामध्ये कित्येक एकरातील उभ्या पिकांचे नुकसान करु शकतो. या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी उत्तर प्रदेशच्या कृषी विभागाने शेतकर्‍यांना जागरूक करण्यासाठी व्यापक मोहीम सुरू केली आहे. आग्रामध्ये जिल्हा प्रशासनाने 204 ट्रॅक्टर रासायनिक फवारणीसह सज्ज ठेवले आहेत. 20 मे रोजी राजस्थानच्या दौसा जिल्ह्यात टोळ कीटक पाहायला मिळाले. अवघ्या 5 दिवसात ही अजमेरपासून 200 कि.मी. अंतरावर दौसा गाठली आणि आता उत्तर प्रदेशात दाखल झाली आहे.

मध्य प्रदेशातील टोळांनी कमीतकमी 12 जिल्ह्यांमधील उभी पिके नष्ट केली आहेत. गेल्या दशकात हा टोळांचा सर्वात मोठा हल्ला आहे. राज्यात टोळने प्रथम 17 मे रोजी मंदसौर आणि नीमच गाठले, त्यानंतर आणखी 10 जिल्हे जाळ्यात ओढले. मंदसौर, नीमच, उज्जैन, देवास, शाजापूर, इंदूर, खरगोन, मुरैना आणि श्योपूर या जिल्ह्यांमध्ये टोळांच्या हल्ल्याचा सर्वाधिक फटका बसला आहे. वारा बदलताच पाकिस्तान व इतर भागातून टोळ कीटक भारतात प्रवेश करतात. पावसामध्ये पाकिस्तानहून भारताकडे हे कीटक पोहचतात.

टोळ कीटक काय असतात?

टोळ नाकतोड्याचाच एक प्रकार आहे. या कीटकामुळे पिकांची दरवर्षी मोठ्या प्रमाणावर हानी होते. त्यांपैकी भारतात खुरपाडी, बिनपंखी नाकतोडा, पट्टेदार नाकतोडा, भातावरील नाकतोडा इ. नाकतोडे पिकांची हानी करतात.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.