आडस । वार्ताहर
केज तालुक्यातील आडस येथिल महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा व्यवस्थापक अक्षय अरविंद जाधव व ग्राहक मित्र नसिर महेबुब शेख यांनी आज खोडस ता.धारूर याठिकाणी बँक आपल्या गावी हा अभिनव उपक्रम राबवला. 10 मार्च 2020 रोजी पुण्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. 15 मार्च 2020 रोजी 16 मार्च पासून शाळा-कॉलेज बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी घेतला आणि काही दिवसातच दिं.23 मार्च पासून संपूर्ण देश बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला.
या संकट काळात अनेक सेवा भावी वृत्तीची माणसे पुढे आली. असेच एक नाव म्हणजे अक्षय अरविंद जाधव महाराष्ट्र ग्रामीण बँक आडस ता.केज या शाखेचे ते शाखाव्यवस्थापक आहेत. बँकेचा व्याप मोठा आहे. परिसरातील 10-15 गावातील ग्राहक या बँकेवर अवलंबून आहेत, अनेक कामासाठी प्रचंड गर्दी असते त्या मानाने सेवा देण्यासाठी अपुरा कर्मचारी वर्ग - केवळ तीन कर्मचारी सोबत घेऊन सेवा देताना या कर्मचार्यांना तारेवरची कसरत करावी लागते. जाधव यांनी खोडस येथे रअभिनव उपक्रम राबवला. या उपक्रमांतर्गत अक्षय अरविंद जाधव यांनी ग्राहक मित्र नसीर महेबुब शेख यांना सोबत घेऊन सकाळीच खोडस गाव गाठले. संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी, श्रावण बाळ योजनेचे लाभार्थी, श्री छत्रपती शिवाजी विद्यालय आडस येथे शिक्षण चालू असलेले सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीचे लाभार्थी, भारत सरकार शिष्यवृत्तीचे लाभार्थी, अनेक ग्राहक बँकेच्या सेवेपासून वंचित होते. संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी योजनेतून भेटणार्या रकमेच्या आधारे त्यांच्या घरात चूल पेटते, एवढ्या गरिबीत जगणारे आहेत, अनेकांना वयोमानानुसार काम होत नाही, या योजने शिवाय त्यांच्याजवळ पैसा येत नाही अशा वृद्ध मंडळीपूढे खायचं काय असा प्रश्न निर्माण झाला होता. आडस येथे बँकेत जाता येत नाही,आर्थिक अडचणीतून अनेक वृद्ध मंडळी हतबल झालेली होती. अशावेळेस जाधव साहेबांनी ग्राहक मित्र नसीर महेबुब शेख यांना सोबत घेऊन खोडस हे गाव गाठले, संजय गांधी निराधार योजनेतील निराधार वृद्ध स्त्री-पुरुषांना,शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांना, रोख रक्कम दिली. खोडस व वाघोली येथील 150 लाभार्थ्यांना यावेळी पैसे वाटप करण्यात आले. यावेळी गावकर्यांनी सहकार्य करून आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली. अक्षय अरविंद जाधव व नसीर महेबुब शेख यांचे या संकटकाळातील सेवाभावी वृत्तीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
Leave a comment