बीड । वार्ताहर
शहरातील धानोरा रस्त्यावर दुचाकीवरुन दारुच्या 38 बाटल्या घेवून चोरटी विक्री करण्यासाठी फिरणार्या नितेश उर्फ गोटू अंबादास काळे (27 रा.भगवानबाब प्रतिष्ठानजवळ,बीड) यास पोलीसांनी ताब्यात घेतले. शनिवारी (दि.23) दुपारी दीडच्या सुमारास गुन्हे शाखेच्या विशेष पथकाचे सहाय्यक निरीक्षक आनंद कांगुणे व पथकातील कर्मचार्यांनी ही कारवाई केली. आरोपी तरुणाविरुध्द शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्याकडून दारुसह दुचाकी व मोबाईल असा 39 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
Leave a comment