सा.बां.विभागासमोरबापूसाहेब उदारे यांचे उपोषण
अंबाजोगाई । वार्ताहर
येथील बापूसाहेब उदारे यांनी एक वर्षांपुर्वी केलेल्या कामाचे देयक न मिळाल्याने उपासमारीची वेळ आल्याचे सांगून तसेच प्रशासनाला कळवत शनिवार, दि. 23 मे पासून कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अंबाजोगाई कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
आमरण उपोषणाबाबत बापुसाहेब उदारे यांनी निवेदनाद्वारे आपले म्हणणे प्रशासनाकडे मांडले आहे. त्यांनी नमुद केले आहे की,स्वा.रा.ती.ग्रा.वै.महा व रूग्णालय, अंबाजोगाई परिसरातील परिचारिका वसतीगृहाच्या संडास व बाथरूम दुरूस्तीचे काम करून तब्बल 9 महिने होवून सुध्दा अद्यापपर्यंत मी केलेल्या कामाचे देयक मला मिळाले नसून कोरोनाच्या संकटामुळे माझी व माझ्या परिवाराची उपासमार होत आहे. ही सर्व कामे करून त्या वस्तीगृहास आधुनिक रूप देण्याचे काम केलेले आहे. हे काम करुन सुध्दा आजपर्यंत मला सदरील कामाचे देयक मिळालेले नाही. श्री.बंडे यांनी आदेश दिल्यामुळे सदरील काम मी तात्काळ पूर्ण केले. परंतु,त्यांची बदली झाल्याने त्यांच्या जागेवर श्री.पाटील हे आले. परंतू,पाटील यांनी माझे बील वेळीच अदा न केल्यामुळे आज माझ्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. मी केलेल्या कामाचे बील तात्काळ अदा करण्यात यावे अशी मागणी बापुसाहेब उदारे यांनी केली आहे.
Leave a comment