केज । वार्ताहर
केज शहरातील क्रांती नगर, भवानी माळ, कोल्हे वस्ती व समता नगर भागातील गोरगरीब व सर्व गरजूवंताना र्याी भागातील नेहमीच समाज कार्यात अग्रेसर असलेले कार्यक्रते शकिल सय्यद व जन विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने, हारून भाई इनामदार यांच्या नेतृत्वाखाली एक महिना भर पूरेल एवढी जीवनावश्यक सामानाची किट घरपोच सरसकट वाटप करण्यात आली.
सदरील भागात सर्व सामान्य मजूर मोठ्या प्रमाणात वास्तव्यात आहेत. सद्य स्थितीत कोरोना रोगामुळे त्यांच्या हाताला कामधंदा भेटत नाही. अशा कठीण समयी शकिल सय्यद व जन विकास मंच त्यांच्या मदतीला धावून आला आहे. सदर वाटपाचा कार्यक्रम सोशल डिस्टन्स ठेवून व सरकारच्या सर्व गाइड लाईन्स पाळून राबविण्यात आला आहे. या मुळे या भागातील नागरिकांचा किमान एक महिन्याच्या जीवनावश्यक गरजांचा प्रश्न मिटला आहे. जीवनावश्यक कीट वाटप करताना शकिल सय्यद मित्रमंडळाचे सर्व कार्यक्रते सोशल डिस्टन्स पाळून उपस्थित होते.या वेळी बोलताना शकिल सय्यद यांनी सदर भागातील नागरीकांच्या प्रत्येक गरजेसाठी मि कुठेही कमी पडणार नाही असा विश्वास व्यक्त केला. या स्तुत्य उपक्रमा बद्दल सर्व स्थरावर शकिल सय्यद व जन विकास मंचाचे कौतुक होत आहे. रमजान ईदच्या पार्श्वभूमी वरती लोकांच्या आडि अडचणीत शकिल सय्यद व जन विकास मंच कडून सामाजिक भान ठेवून केलेली मदत कौतुकास्पद आहे.अडी अडचणीच्या प्रत्येक कार्यात शकिल भाई सय्यद हे नेहमीच आमच्या मदतीसाठी सर्वात पूढे आसतात अशी प्रतिक्रिया या भागातील नागरिक राजेभाऊ मस्के यांनी व्यक्त केली.
Leave a comment