केज । वार्ताहर
केज तालुक्यात महामार्ग आणि सूतगिरणीच्या कामावर काम करणारे बिहार राज्यातील अनेक मजूर हे लॉकडाउनमुळे अडकून पडले होते. त्याची माहिती जिल्हाधिकार्यांना कळविताच त्या मजुरांना यांच्या गावी सोडण्यासाठी त्यांना औरंगाबाद रेल्वे स्टेशनपर्यंत एसटी बसने रवाना करण्यात आले.
या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यात लोकनेते गोपीनाथराव मुंडे सूतगिरणी आणि महामार्गाच्या कामावर कळंब नजीकच्या पुलाच्या कामावर बिहार राज्यातील काम करणारे अनेक मजूर होते लॉक डाउनमुळे सर्व कामे बंद आहेत. त्यामुळे त्यांची खाण्या पिण्याची परेशानी होती. तसेच त्यांना यांच्या गावाकडे जाण्यासाठी काही व्यवस्था नव्हती. त्यांच्या या परिस्थितीचे पत्रकार गौतम बचुटे व पत्रकार डी.डी.बनसोडे यांनी अवलोकन केले आणि त्या मजुरांना रमेश भिसे व मनीषा घुले यांच्याकडून जिवणावश्यक वस्तू त्यांना देऊन काही दिवस त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडविला. त्या नंतर पत्रकार गौतम बचुटे यांनी या सर्व बिहारी मजुरांची माहिती संकलित करून ती यादी तहसील व पोलीस स्टेशन मार्फत मा. जिल्हाधिकारी त्यांना पाठविण्यात आली. त्या नुसार या मजुरांना धारूर आगराच्या एसटी बसमधून औरंगाबादकडे रवाना करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.आशिष मुळे, पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन, वसंत बापू काळे, सचिन चाळके, रत्नदीप चाटे, स्वामी, एसटीचे महामंडळ धारूर आगाराचे बिक्कड साहेब, सपोउनि महादेव गुजर, मधुकर रोडे, प्रेमचंद वंजारे, मंगेश भोले, शेख मतीन, धुमक साहेब, पत्रकार दत्तात्रय हंडीबाग, गौतम बचुटे, नितीन मेटे हे उपस्थित होते. या मजुरांची त्यांच्या राज्यात जाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून पत्रकार गौतम बचुटे यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना मेसेज पाठविताच त्यांनी तात्काळ ओके असे उत्तर दिले आणि निवासी उपजिल्हाधिकारी एस एस गायकवाड यांना कार्यवाही करण्याचे आदेश दिले त्या नुसार सर्व चक्रे फिरली आणि मजुरांची जाण्याची व्यवस्था झाली. या मजुरांना गावी जाण्यासाठी तहसीलदार मेंढके, पोलीस निरीक्षक त्रिभुवन, सहाय्यक पोलीस निरीक्षक झोटे, पोलीस कॉन्स्टेबल मतीन शेख, बालासाहेब ढाकणे आणि वरिष्ठ लिपिक धुमक यांनी तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालयात मजुरांची माहिती पाठविली. ही त्यांचीही खूप मदत झाली.
Leave a comment