धारूर । वार्ताहर
धारूरचे नगराध्यक्ष व भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ. स्वरूपसिंह हजारी यांनी कोरोना आपत्तीत बालाघाट प्रतिष्ठाणच्या वतीने शहरातील 2 हजार 500 गरजू कुटूंबाना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. या वाटपाचे दि.24 रोजी पत्रकारांच्या उपस्थितीत समारोप करण्यात आला.
सध्या कोरोनाचे प्रादूर्भाव रोकण्यासाठी प्रत्येकजन आपआपल्या पध्दतीने मदत करत आहे. केंद्र व राज्य शासन नागरीकांचे रक्षणासाठी सर्व प्रकारच्या उपाययोजना करत आहे. धारूर शहराचे नगराध्यक्ष व भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ. स्वरूपसिंह हजारी यांनी बालाघाट प्रतीष्ठानच्या वतीने जिवनावश्यक वस्तू चे दोन हजार पाचशे कुटूंबाना किट वाटप केले. कोरोना विरूध्द लढण्यासाठी पौष्टीक वस्तूंचा समावेश या किट मध्ये करण्यात आला. शहरातील गरजू कुंटूंबाना नियोजन बध्द पणे कार्यकर्त्या मार्फत घरपोच हे किट देण्याची मोहीम राबवण्यात आली. हे करत असताना शासनाला या कोरोना विरूध्द चे लढाईत मदत व्हावी म्हणून डॉ. हजारी यांनी पंतप्रधान सहायता निधी ला 100,000 /- (एक लक्ष रुपये) निधी दिला आहे. दि.24 रविवार रोजी शहरातील काही भागातील 70 गरजूनां पत्रकारांच्या उपस्थितीत किट देवून समारोप करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष डॉ. स्वरुपसिंह हजारी, माजी नगरसेवक अजयसिंह हजारी बाळासाहेब गायकवाड, संतोष सिरसट, संतोषसिंह पवार ,रवि कुंभार , दिपक पटवर्धन , नगरसेवक सचिन दुबे, सुरेश लोकरे यांच्यासह पत्रकार बांधव उपस्थित होते.
Leave a comment