बीड । वार्ताहर
जिल्ह्यात शनिवारी पाठवलेल्या स्वॅबपैकी तिघांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले होते. यातील बीड शहरातील पालवण चौक भागात असलेला पॉझिटिव्ह रुग्ण जवळपास 29 जणांच्या संपर्कात आल्याची माहिती असून यात नऊ पोलिसांसह इतर 20 जणांचा समावेश आहे. दरम्यान संपर्कात आलेल्या सर्व नऊ पोलिसांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत तर इतर सर्व संपर्कात आलेल्यांची शोध सुरू आहे.
बीडच्या पालवण चौकातील हा व्यक्ती 17 मे रोजी मुंबई येथून एका टेम्पोत बीडमध्ये आला. त्याच टेम्पो मध्येच इतर 20 प्रवासी प्रवास करत होते. या टेम्पोसह प्रवाशी बेकायदेशीररित्या जिल्ह्यात प्रवास करत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे त्यांच्या विरोधात ग्रामीण पोलिसात गुन्हाहीदाखल झाला आहे. नवगण राजूरी येथे ग्रामीण पोलिसांनी याच टेम्पोची तपासणी होती व ते सर्व नऊ पोलीस सदरील कोरोनाबधित रुग्णाच्या संपर्कात आले होते. रविवारी त्या सर्व नऊ पोलिसांचे स्वॅब तपासणीस पाठवण्यात आले आहेत. तसेच त्या व्यक्तीच्या सोबत टेम्पोमध्ये प्रवास करणार्या त्या 20 जनांपैकी चारजण संभाजीनगर भागातील असून त्यांचे स्वॅब आज तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत तर अन्य सोळा जण हे दिंद्रुड आणि जालना जिल्ह्यातील मंजरथ येथील असल्याचे समजते.
Leave a comment