बीड | वार्ताहर
बीड शहरातील संभाजीनगर, बालेपीर, येथे कोरोना विषाणूचे लागण झालेला रुग्ण चार व्यक्तींच्या संपर्कात आला असल्याचे आढळून आले आहे, त्यामुळे संबंधित क्षेत्रात कन्टेनमेंट झोन घोषित करण्यात आले असून पूर्णवेळ संचारबंदी लागू केली आहे असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.
याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सादर केला आहे. त्यामुळे बीड शहरातील पॉझिटिव्ह व्यक्ती संभाजीनगर, बालेपीर, बीड येथील असल्याने संभाजी नगर भागातील शेख खलीलोद्दीन शेख हफिजोद्दिन यांच्या घरापासून विजय कुमार किसनराव वीर यांच्या घरा पर्यंतहा परिसर कन्टेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. वरील सर्व परिसर पुढील अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ बंद करण्यात येवून संचार बंदी लागू करण्यात आली आहे .राज्य शासनाने लॉकडाऊनचा कालावधी ३१ मे २०२० पर्यंत वाढविला असल्याने त्याअनुषगाने जिल्ह्यात दिनांक ३१ मे २०२० रोजीचे रात्री १२ पर्यंत फौजदारी प्रक्रिया दंड संहिताचे कलम १४४ (१)(३) लागू करण्यात आले आहेत. तसेच यापूर्वी या कार्यालयाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश, सुधारीत आदेश, सुधारणा आदेश या आदेशासह अंमलात राहतील.
Leave a comment